शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालींना वेग

By admin | Updated: June 27, 2015 01:32 IST

राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

बल्लारपूर : राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार बल्लारपूर तालुक्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक येत्या ४ आॅगस्टला होऊ घातली आहे. सदर ग्रामपंचायतीचे नवीन सरपंच कोण होणार, याचे वेध मतदारांना लागले आहे. आता बल्लारपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालीने वेग घेतला असून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.बल्लारपूर तालुक्यात विसापूर, नांदगाव (पोडे), पळसगाव, हडस्ती, कळमना, मानोरा, आमडी, कोर्टिमक्ता, किन्ही व गिलबिली येथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक यावर्षी होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारांची शोध मोहीम सुरू केली आहे. अशातच राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याने उमेदवारांसह कार्यकर्तेही प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.तालुक्यात विसापूर सर्वात मोठी ग्रामपंचायत असून एकुण १७ जागांपैकी ९ जागेवर महिलांना प्रतिनिधीत्व मिळणार आहे. पळसगावमध्ये एकुण ९ पैकी ५ जागेवर महिला उमेदवार निवडल्या जातील. किन्ही येथे एकूण ७ ग्रामपंचायत सदस्यापैकी ४ महिलासाठी राखीव आहेत. मानोरा येथे ९ पैकी ५, आमडी येथे ७ पैकी ४, कोर्टिमक्ता येथे ७ पैकी ४, कळमना येथे ९ पैकी ५, हडस्ती येथे ७ पैकी ४, नांदगाव (पोडे) येथे ११ पैकी ६ तर गिलबिली येथे ९ पैकी ५ जागा महिलांना आरक्षित करण्यात आल्या आहेत.यामुळे गावपातळीवर राजकारणात महिलांचे वर्चस्व आगामी निवडणुकीत दिसून येणार आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका ४ आॅगस्टला घेण्याचे निश्चित झाल्याने गावपातळीवरचे राजकारण ढवळून निघायला सुरूवात झाली आहे. राजकीय पक्षाने उमेदवार निवडण्यासाठी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. प्रत्येकजण राजकारणाच्या बाता रंगविताना दिसून येत आहे. बल्लारपूर तालुक्यात १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या असून यातील सहा ग्रामपंचायतीवर काँग्रेसप्रणित आघाडीचे तर चार ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे सरपंच आहेत. गावातील सत्ताकारण आपल्या पक्षांकडे राहावे म्हणून काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते डावपेच आखत आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने गावातील राजकारण ताब्यात घेण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उत्साहित आहेत. (शहर प्रतिनिधी)असा आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रमग्रामपंचायत निवडणुकीची सुरूवात ४ जुलै रोजी नोटीस प्रसिद्धीने होणार आहे. १३ ते २० जुलै दरम्यान निवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करावे लागणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी २१ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २३ जुलै आहे. त्याच दिवशी दुपारी ४ वाजतानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान ४ आॅगस्टला सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान घेतले जाणार असून मतमोजणी ६ आॅगस्टला तहसील कार्यालयात केली जाईल.सरपंच पदाचा मान या जाती प्रवर्गांना मिळणारबल्लारपूर तहसील प्रशासनाने सरपंच पदाचे आरक्षण सोडत २६ मार्च रोजी काढली होती. त्यानुसार आगामी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तालुक्यातील विसापूर येथे अनुसूचित जाती महिला सरपंच होणार आहे. हडस्ती व गिलबिली येथील सरपंच पद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. नांदगाव (पोडे) व पळसगाव येथे अनुसूचित जातीच्या प्रवर्गाला सरपंच पदाचा मान मिळणार आहे. किन्ही व कळमना ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमाती महिलांना, मानोरा व आमडी ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला तर कोर्टिमक्ता ग्रामपंचायत सर्वसाधारण महिलेच्या ताब्यात राहणार आहे. १० पैकी ६ ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार आहे.