रविवारी पार पडली सर्वाधिक लग्ने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST2021-07-19T05:00:00+5:302021-07-19T05:00:51+5:30
विवाह आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग असतो. यामुळे आप्तेष्ट, नातेवाईक सर्वांना विशेषकरून बोलाविले जाते. बहुतांश जण हजेरीही लावतात. मात्र मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रशासनाने विवाह सोहळ्यात उपस्थितीवर बधने घातली. त्यामुळे अनेकांनी आयोजित विवाह सोहळ्याची तारीख पुढे ढकलली. मात्र कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे गेले नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी विवाह उरकण्याकडे अनेकांचा कल आहे.

रविवारी पार पडली सर्वाधिक लग्ने
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून अनेक कुटुंबीयांनी आयोजित विवाह सोहळ्यांच्या तारखा पुढे ढकलल्या. सध्या थोडीफार शिथिलता मिळताच विवाह उरकण्याचा सपाटा सुरू असून या वर्षातील सर्वाधिक विवाह पार पडण्याचा उच्चांक रविवारी ठरला. यामुळे रविवारी दिवसभर शहरात लगबग बघायला मिळाली.
विवाह आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग असतो. यामुळे आप्तेष्ट, नातेवाईक सर्वांना विशेषकरून बोलाविले जाते. बहुतांश जण हजेरीही लावतात. मात्र मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रशासनाने विवाह सोहळ्यात उपस्थितीवर बधने घातली. त्यामुळे अनेकांनी आयोजित विवाह सोहळ्याची तारीख पुढे ढकलली. मात्र कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे गेले नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी विवाह उरकण्याकडे अनेकांचा कल आहे. रविवारी शहरातील लाॅन, मंगल कार्यालये, हाॅटेल आदींमध्ये विवाह सोहळे पार पडले. सकाळच्या वेळी जिकडे जितके बॅण्डचा आवाज गुंजत होता.
यामुळे मंगल कार्यालय संचालकांसह, बॅण्ड पथक, कॅटरर्स आदींचा काही प्रमाणात का होईना, फायदा झाला. चंद्रपूर येथील दाताळा मार्ग, नागपूर रोडवरील मंगल कार्यालय, हाॅटेलमध्ये सर्वाधिक लग्ने पार पडली. याशिवाय तालुकास्तरावरही लग्न पार पडले.
कोरोना नियम पायदळी
- कोरोना संकटामुळे शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवेशिवाय इतर बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश आहेत. विशेषत: सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंतच बाजार सुरू असतो. असे असले तरी रविवारी पार पडलेल्या लग्नसमंभामध्ये मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळाली. विशेषत : अनेकांनी मास्कसुुद्धा लावले नव्हते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता, नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे.
आषाढामध्ये विवाह?
- आषाढ महिना हा पावसाचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये बहुतांश जण कार्यक्रम करण्याचे टाळतात. मात्र या वर्षी इलाज नसल्यामुळे लग्न समारंभ आषाढ महिन्यात पार पाडले जात आहेत.
ग्रामीण भागात शेतकरी शेतात व्यस्त
- सध्या शेती हंगामाचे दिवस आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या रोवणी, कपाशीचे निंदन, डवरणी, रासायनिक खत देणे आदी कामे सुरु आहे. यासाठी मजुरांची टंचाई आहे. त्यामुळे शेतमजुरांना अतिरिक्त पैसे देवून शेतकरी शेती कामे करीत आहे. दुसरीकडे शहरामध्ये सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू आहे. विशेशत: सुटीच्या दिवशी लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात आहे.