पदोन्नतीतील आरक्षणासाठी मोर्चाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:32 IST2021-09-06T04:32:51+5:302021-09-06T04:32:51+5:30

पदोन्नतीच्या आरक्षणासाठी सर्व मागासवर्गीय कर्मचारी संघटनानी, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जूनला ...

Morcha preparation for promotion reservation | पदोन्नतीतील आरक्षणासाठी मोर्चाची तयारी

पदोन्नतीतील आरक्षणासाठी मोर्चाची तयारी

पदोन्नतीच्या आरक्षणासाठी सर्व मागासवर्गीय कर्मचारी संघटनानी, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जूनला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, मोर्चानंतरही सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात मागासवर्गीय समाजात असंतोष निर्माण झाला असल्याने मोर्चाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य प्रतिनिधी सुभाष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा आरक्षण हक्क समितीचे जिल्हा निमंत्रक रवींद्र मोटघरे, जिल्हा समिती सदस्य आणि आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. शांताराम उईके, जिल्हा समितीचे सदस्य आणि कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष देव नगराळे, जिल्हा समिती सदस्य कविता मडावी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे शालिक माऊलीकर यांनी कळविले आहे.

Web Title: Morcha preparation for promotion reservation