अपात्र सदस्याला मासिक सभेची नोटीस

By Admin | Updated: May 15, 2016 00:40 IST2016-05-15T00:40:51+5:302016-05-15T00:40:51+5:30

अपर जिल्हाधिकाऱ्याने अपात्र ठरविलेल्या ग्रामपंचायत सदस्याला ग्रामविकास अधिकाऱ्याने रितसर ग्रामपंचायतीच्या कामकाजात सहभागी करून घेतले.

Monthly Meeting Notice to Ineligible Member | अपात्र सदस्याला मासिक सभेची नोटीस

अपात्र सदस्याला मासिक सभेची नोटीस

चौकशी थंडबस्त्यात : अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
धाबा : अपर जिल्हाधिकाऱ्याने अपात्र ठरविलेल्या ग्रामपंचायत सदस्याला ग्रामविकास अधिकाऱ्याने रितसर ग्रामपंचायतीच्या कामकाजात सहभागी करून घेतले. यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचीच पायमल्ली झाली, असा आरोप विद्यमान ग्रा.पं. सदस्य रामकृष्ण सांगडे यांनी केला आहे. या प्रकरणी सचिवावर कायदेशीर कारवाईची मागणीही त्यांनी केली.
धाबा येथील ग्रामपंचायत सदस्य हिराचंद कुंदीकुरवार हे वार्ड क्रमांक २ मधून निवडणूक जिंकले. पण हिराचंद कुंदीकुरवार यांच्याकडे शौचालय नसल्याने याबाबत तक्रार करण्यात आली. त्या तक्राराची दखल घेत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी शहानिशा केली व ८ फेब्रुवारीला हिराचंद कुंदीकुरवार यांना अपात्र घोषित केले. या आदेशाची प्रत अर्जदार, सचिव व गोंडपिपरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठविली. असे असतानाही ग्रामविकास अधिकाऱ्याने २९ फेब्रुवारीला झालेल्या मासिक सभेची नोटीस अपात्र ठरलेल्या कुंदीकुरवार यांना नोटीस पाठवून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण सांगडे यांनी केली आहे. ेझालेली चूक सचिवाला चांगलीच भोगावी लागणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
हिराचंद कुंदीकुरवार यांना मासिक सभेची नोटीस पाठविल्याबद्दल ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष झाडे, रामकृष्ण सांगडे, राणी बंडावार, शालिनी सांगडे यांनी आक्षेप घेतला त्यांनी. याबाबत अपर जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनदेखील देण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Monthly Meeting Notice to Ineligible Member