फुटबॉल स्पर्धेत मोनिका पाठक चमकली

By Admin | Updated: September 23, 2015 04:58 IST2015-09-23T04:58:02+5:302015-09-23T04:58:02+5:30

येथील एम.डी. मेमोरियल शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित श्री साई पॉलिटेक्निकची विद्यार्थीनी मोनिका पाठक हिने

Monica reader shines in football tournament | फुटबॉल स्पर्धेत मोनिका पाठक चमकली

फुटबॉल स्पर्धेत मोनिका पाठक चमकली

चंद्रपूर: येथील एम.डी. मेमोरियल शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित श्री साई पॉलिटेक्निकची विद्यार्थीनी मोनिका पाठक हिने एम्स्टर्डममध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी दाखविली आहे.
नागपूर व दिल्ली येथे घेण्यात आलेल्या शिबिरात उत्कृष्ठ प्रदर्शन करणाऱ्या मोनिकाची आंतराष्ट्रीय फुटबॉल कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. मोनिकाच्या चमकदार कामगिरीबद्दल येरगुडे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष प्रा.व्ही.एम. येरगुडे, उपाध्यक्ष अमित येरगुडे, एसएससीईटीचे प्राचार्य डॉ.जे.एफ अग्रवाल, श्री साई पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.एस.एन. पिल्लारे, प्रशिक्षक अखिलेश पांडे यांच्यासह सर्व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Monica reader shines in football tournament