वेकोलिच्या मुंगोली कार्यालयाला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:12+5:302021-02-05T07:38:12+5:30
घुग्घुस : वेकोलिच्या मुंगोली कोळसा खाणीचे उपमहाप्रबंधक वैरागडे यांच्या कार्यालयाला रविवारी दुपारी ४ वाजता भा.को.म. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ...

वेकोलिच्या मुंगोली कार्यालयाला ठोकले कुलूप
घुग्घुस : वेकोलिच्या मुंगोली कोळसा खाणीचे उपमहाप्रबंधक वैरागडे यांच्या कार्यालयाला रविवारी दुपारी ४ वाजता भा.को.म. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कुलूप ठोकले. त्यानंतर दोन्ही उभय पक्षात समाधानकारक चर्चा झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान कुलूप काढून कार्यालय सुरू केले.
मुंगोलीच्या कैलाशनगर कामगार वसाहतमधील क्वाॅर्टर वितरणावरून कामगार संघटना व व्यवस्थापनामध्ये मतभेद आहे. उपमहाव्यवस्थापक अधिकांश वेळ खाणीत देत असून कार्यालयात चर्चेसाठी वेळ देत नाही. या कारणावरून असंतोष निर्माण झाला होता. रविवारी सकाळी १० वाजतापासून वारंवार सूचना देऊनही सायंकाळपर्यत कार्यालयात न आल्याने संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी मुख्य गेटला कुलूप ठोकले. सदर घटनेची माहिती मिळताच वणी क्षेत्राचे कार्मिक प्रबंधक मनोगरम हे आंदोलनस्थळी पोहचले व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी समाधानकारक चर्चा केल्यानंतर कुलूप काढले.