भटाळा खदानीत महिला कामगाराचा दरड कोसळल्याने मृत्यू ?

By Admin | Updated: May 19, 2016 00:41 IST2016-05-19T00:41:45+5:302016-05-19T00:41:45+5:30

तालुक्यातील भटाळा गावाच्या परिसरात पांढऱ्या दगडाच्या मोठ्या प्रमाणात खदानी आहेत.

Molestation woman worker dies due to labor unrest? | भटाळा खदानीत महिला कामगाराचा दरड कोसळल्याने मृत्यू ?

भटाळा खदानीत महिला कामगाराचा दरड कोसळल्याने मृत्यू ?

तक्रार नाही : प्रकरण दडपले जाण्याची शक्यता
वरोरा : तालुक्यातील भटाळा गावाच्या परिसरात पांढऱ्या दगडाच्या मोठ्या प्रमाणात खदानी आहेत. यामध्ये अनेक खदानीमध्ये उत्खनन करण्याची परवानगी नसल्याचे समजते. अशाच एका खदानीत परप्रांतीय महिलेचा काम करताना दरड कोसळल्याने मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात केली जात आहे. या प्रकरणाची तक्रार कुठेही करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रकरण दडपले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वरोरा तालुक्यातील भटाळा गावाच्या परिसरातील टेकड्यामध्ये उच्च प्रतिचा पांढरा दगड आहे. मागील कित्येक वर्षापासून यामधील दगड काढून गिट्टी तयार करून मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जात आहे. दगड काढत असताना या परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये अनेकदा अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. भटाळा परिसरातील अनेक खदानीमध्ये उत्खनन करण्याची परवानगी नसल्याची माहिती समोर आली आहे. १७ मे रोजी भटाळा परिसरात खदानीमध्ये उत्खनन करण्याचे काम काही परप्रांतीय मजूर करीत होते. त्यावेळी खदानीची दरड कोसळल्याने सकाळी एक महिला मजूर गंभीर जखमी झाली. या जखमी महिलेस रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याच वाहनाने मृताच्या कुटुंबीयास काही रोख रक्कम देवून मूळ राहत असलेल्या राज्यात परत पाठविल्याचे समजते. या प्रकरणी शहानिशा करण्याकरिता प्रशासनाकडे विचारणा केली असता कुठेही नोंद आढळून आली नाही. खदानीचा मालक स्थानिक असल्याने ग्रामस्थ प्रकरणाची वाच्चता गावात करीत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी प्रशासनाने केल्यास खदान अवैध की वैध, मृताच्या कुटुंबियांना किती मदत देण्यात आली, आदी बाबी समोर येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Molestation woman worker dies due to labor unrest?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.