शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षक आत्महत्या प्रकरणातील आरोपी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

आत्महत्याग्रस्त अधिक्षक सुभाष पवार कर्तव्यावर असताना शाळेच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती. ती पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे. सदर सुसाईट नोटची प्रत पिडिताची पत्नी लता पवार यांनी मागणी करूनही देण्यात आली नाही.

ठळक मुद्देउपोषणाला बसण्याचा इशारा : प्रशासनाला कुटुंबीयांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तालुक्यातील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळेच्या अधिक्षकांनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेला आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी यातील दोषींना अटक करण्यात आली नसल्याचा आरोप करीत आत्महत्तेस प्रवृत्त करण्याऱ्या सर्वांना तत्काळ अटक करावी, अन्यथा ८ जानेवारीपासून संपूर्ण कुटूंबासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पिडिताची पत्नी लता सुभाष पवार व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांत सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमनार व जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदनाद्वारे दिले.आत्महत्याग्रस्त अधिक्षक सुभाष पवार कर्तव्यावर असताना शाळेच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती. ती पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे. सदर सुसाईट नोटची प्रत पिडिताची पत्नी लता पवार यांनी मागणी करूनही देण्यात आली नाही. या प्रकरणात दोषी असलेल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांची चौकाशी करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मात्र या प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य गुन्हेगार आजारी असल्याचे ढोंग करीत आहेत तर दुसरा आरोपी गडचांदूर, जिवती परिसरात राजरोसपणे फिरत असल्याचा आरोप करण्यात आला असून पोलीस प्रशासन त्याला अटक न करता आम्हालाच अटक करण्याबाबत भ्रमणध्वनीव्दारे धमकावत असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.सदर प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासमवेत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पिडीताची पत्नी, नातेवाईक तसेच उपस्थित शिष्टमंडळाने दिला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणानंतर आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या माध्यमातून शाळा बंद आंदोलनही करण्यात आले. मात्र अद्यापही प्रशासनाने पाहिजे तशी दखल घेतली नसल्याचे आरोप केला जात आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी