शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

जिल्ह्याच्या आराखड्यासाठी आधुनिक नियोजन भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 5:00 AM

जिल्ह्यासाठी जिल्ह्याच्या नियोजन भवनाचे वेगळेच महत्त्व असते. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य असे स्थान असते. खासदार, आमदार यांची कामे असोत अथवा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निर्माण केलेले नियोजन भवन महाराष्टष्ट्रामध्ये एक देखणी वास्तू म्हणून पुढे आले आहे.

ठळक मुद्देशासकीय कार्यालये होताहेत आधुनिक : भवनातून होतो विकासकामांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना हायटेक करण्याचे काम सध्या झपाट्याने सुरू आहे. देशासाठी संसदेचे, राज्यासाठी विधिमंडळाचे, तसेच जिल्ह्यासाठी जिल्ह्याच्या नियोजन भवनाचे वेगळेच महत्त्व असते. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य असे स्थान असते. खासदार, आमदार यांची कामे असोत अथवा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निर्माण केलेले नियोजन भवन महाराष्टष्ट्रामध्ये एक देखणी वास्तू म्हणून पुढे आले आहे.देशामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या राज्यांच्या विधिमंडळाच्या सभागृहाला शोभेल, अशा पद्धतीची मांडणी या सभागृहाची करण्यात आली आहे. अर्धवर्तुळाकार असणारे हे सभागृह अत्याधुनिक संवाद साधनांनी परिपूर्ण आहे. या सभागृहाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही भागात सभागृहात बसले असल्यास थेट डायसशी आपला संपर्क येतो. या ठिकाणची असणारी दृकश्राव्य माध्यमांची आखणी या सभागृहाच्या वैभवात भर टाकते. बोलणाºया प्रत्येकांची छबी डायसच्या मागील स्क्रिमवर उमटेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये नियोजन विभाग, मानव विकास विभाग, चांदा ते बांदा, पालकमंत्री महोदयांचे संपर्क कार्यालय अशा महत्त्वपूर्ण कार्यालयाचीदेखील रचना करण्यात आली आहे. ७ कोटी २० लाख तरतुदीच्या दोन मजली इमारतीला आतील अर्धवर्तुळाकार बैठक व्यवस्था वेगळेपण देते. या सभागृहात ३०३ व्यक्तिंना बसण्याची क्षमता आहे. याच नियोजन भवनातून जिल्ह्यात होणाऱ्या विविध कामांचा व प्रस्तावित कामांचा मागोवा घेत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याशिवाय शासकीय इमारतींनाही हायटेक करण्याचे काम जोमाने सुरू आहे. मूल व पोंभूर्णा येथे नवीन प्रशासकीय भवन बांधण्यात आले. या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये सध्या कार्यरत आहेत. अनेक नवीन आरोग्य केंद्रांना इमारतींसाठी निधी मंजूर झाला आहे.पोलीस ठाण्याचे रुपडे पालटलेजिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांचा चेहरामोहरा आता बदलला आहे. बल्लारपूर व भद्रावती महाराष्टष्ट्रातील उत्तम पोलीस स्टेशनची वास्तू म्हणून गणल्या गेल्या आहेत. बल्लारपूर व भद्रावती या पोलीस ठाण्याला सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल आयएसओ मानांकन मिळाले आहे. २०१८ मध्ये दोन्हीही पोलीस स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. बल्लारपूर हे शहर गोंड राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हा इतिहास प्रथमदर्शी दिसावा, अशी देखणी किल्लासदृश वास्तू बल्लारपूर पोलीस ठाण्याची झाली आहे. एखाद्या अभेद्य किल्ल्याप्रमाणे हे पोलीस ठाणे जुन्या पोलीस ठाण्याच्या जागेवरच उभे राहिले आहे. पोलिसांच्या दृष्टीने आवश्यक असणाºया सर्व सोयीसुविधांची उपलब्धता या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. या लोकार्पणानंतर काही महिन्यांतच या पोलीस स्टेशनला आयएसओ मानांकन मिळाले आहे. भद्रावती येथील पोलीस ठाणेदेखील अद्ययावत करण्यात आले आहे. बल्लारपूर व मूल या ठिकाणी पोलीस दलांच्या निवासासाठी उभारण्यात आलेले संकुलदेखील उच्च दर्जाचे आहे.जिल्ह्यातील विविध विकासकामांचा पाठपुरावा करणारे एखादे स्वतंत्र कार्यालय असावे, असे आपणाला वाटले. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतित अमूल्य असे स्थान असते. खासदार व आमदार यांची कामे असोत वा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. मात्र चंद्रपुरात असे नियोजन भवन नव्हते. त्यामुळे चंद्रपुरात भव्य व देखणे नियोजन भवन शासनाच्या माध्यमातून उभारले. ही इमारत नजरेत भरते. राज्यातील एक देखणी वास्तू म्हणून आता ते चर्चेला आले आहे.-सुधीर मुनगंटीवार, अर्थ, नियोजन व वनमंत्री, महाराष्ट्र शासन.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार