बेपत्ता तरुणी अजिंठ्यात आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST2021-02-11T04:29:39+5:302021-02-11T04:29:39+5:30

दुर्गापूर : मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीला दुर्गापूर पोलिसांनी अजिंठा येथून ताब्यात घेत कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. २४ डिसेंबरपासून ...

The missing girl was found in Ajanta | बेपत्ता तरुणी अजिंठ्यात आढळली

बेपत्ता तरुणी अजिंठ्यात आढळली

दुर्गापूर : मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीला दुर्गापूर पोलिसांनी अजिंठा येथून ताब्यात घेत कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

२४ डिसेंबरपासून केसरी नंदननगरात राहणारी एक तरुणी बेपत्ता होती. याबाबत त्या कुटुंबीयांनी दुर्गापूर ठाण्यात तक्रार नोंदविली. ती कुठे गेली याबाबत कसलाच सुगावा नव्हता. तत्काळ पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गापूरचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी विशेष पथक तयार केले. या पथकाने सर्वत्र शोध घेतला मात्र तिचा काही थांगपत्ता लागला नाही. दरम्यान त्या मुलीचे लोकेशन गाठले. ती औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी अजिंठा गाठून शोधाशोध केली. यावेळी ही मुलगी अजिंठा येथे आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेत कुटुंबीयांकडे सुपुर्द केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने, पोलीस हवालदार सुनील गौरकार, अशोक मंजूळकर, उमेश वाघमारे, पोलीस शिपाई मनोहर जाधव, संतोष आडे, सूरज लाटकर आदींनी केली.

Web Title: The missing girl was found in Ajanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.