रॉयल्टी न भरताच होते गौण खनिजांचे खनन

By Admin | Updated: March 12, 2017 01:30 IST2017-03-12T01:30:08+5:302017-03-12T01:30:08+5:30

रस्त्याच्या कामासाठी लागणारी गिट्टी व मुरूम घेताना परवाना घेण्यात यावा, असा उल्लेख अंदाज पत्रकावर

Minor mining was minced without royalty | रॉयल्टी न भरताच होते गौण खनिजांचे खनन

रॉयल्टी न भरताच होते गौण खनिजांचे खनन

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष +: महसूल विभागाला लाखोंचा फटका
शंकर चव्हाण   जीवती
रस्त्याच्या कामासाठी लागणारी गिट्टी व मुरूम घेताना परवाना घेण्यात यावा, असा उल्लेख अंदाज पत्रकावर असतानाही जवळच्याच डोंगर व नाल्यात खोदून विनापरवाना अवैध गिट्टी व मुरूमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान दिसून आले. यातून शासनाचा महसूल बुडविला जात आहे. संबंधित विभाग याकडे कानाडोळा का करताहेत, कंत्राटदार व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे साटेलोटे झाले की काय, अशी जोरदार चर्चाही परीसरात सुरू आहे
लोकमत प्रतिनिधीने जीवती -केकेझरी या पाच कि.मी.रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामावर भेट दिली असता कंत्राटदार अति नफा कसा कमवितो, याचे बिंग फुटले. सदर रस्त्याच्या कामासाठी बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्प योजनेतून पाच कोटी रूपयांचे बजेट मंजूर झाले. हे काम चंद्रपूरच्या एका नामवंत ठेकेदाराला देण्यात आले आहे. रस्ता रूंदीकरणाच्या कामाचे खोदकाम करून थोडीफार खडीमिशनवरील गिट्टी दाखविण्यापुरती आणुन ठेवली असून केलेल्या खोदकामात विना परवाना ५० ते ६० ब्रॉस अवैधरित्या गिट्टी वापरली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी लागणारे सर्व साहित्य जवळपासच्या डोंगरातून किंवा नाल्यातून वडार लावून फोडले जात आहे. हा प्रकार येथेच नाही तर पहाडावरील घनपठार, येसापूर -पळसगुडा, शंकरलोधी, सोरेकासा-शंकरपठार, येरमीयेसापुर -महापांढरवणी, अशा अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध गिट्टी व मुरूम वापरले असून महसुल विभागाला लाखो रूपयांचा चुना लावला जात आहे
सदर रस्ता तयार करण्यासाठी अंदाजपत्रकावर खडीमिशनवरील गिट्टीचा वापर करणे असा उल्लेख केला असतानाही कंत्राटदार भरदिवसा अवैध गिट्टी व इतर साहित्य वापरतो कसा? त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही.
त्यांच्यात संगणमत तर झाले नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी
शासनाचे कर चुकवून कमी दरात रस्त्याच्या कामासाठी लागणारी गिट्टी व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात वापरत असतानाही त्यांच्यावर कुठलीच कारवाई आतापर्यंत झाली नाही. त्या कामावर साहित्य पुरवठ्यासाठी लावलेल्या सुशिक्षित बेरोजगाराच्या ट्रॅक्टरवर मात्र कारवाई करून मोठ्या कंत्राटदाराची अधिकाऱ्यांकडून पाठराखण केली जात आहे.
अशी होते करचुकवेगीरी
रस्त्याच्या कामासाठी गिट्टी, मुरूम व इतर साहित्याची आवश्यकता असते आणि हे संपूर्ण साहित्य खडीमिशनवरील गिट्टी व इतर परवानाप्राप्त साहित्य वापराव,े असे अंदाज पत्रकावर उल्लेख केला आहे. मात्र हे परवानाप्राप्त साहित्य आणण्यासाठी त्यांना एका ब्रॉससाठी जवळपास तीन ते चार हजाराचा खर्च सहन करावा लागतो. हा सर्व खर्च टाळण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून कमी दरात अवैध गिट्टी व मुरूम वापरून करचुकवेगीरी करण्याचे प्रकार वाढत आहेत.

Web Title: Minor mining was minced without royalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.