सात महिन्यांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST2021-07-01T04:20:30+5:302021-07-01T04:20:30+5:30

राजुरा : येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी मागील सात महिन्यांपासून बेपत्ता आहे. असे असले तरी पोलीस तिचा अद्यापही शोध ...

The minor girl has been missing for seven months | सात महिन्यांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

सात महिन्यांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

राजुरा : येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी मागील सात महिन्यांपासून बेपत्ता आहे. असे असले तरी पोलीस तिचा अद्यापही शोध घेऊ शकले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

या प्रकरणातील संबंधित तपास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी यापूर्वी एका पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. तथा त्याच दिवशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची देखील भेट या मुलीच्या पालकांनी सूरज ठाकरे यांच्या माध्यमातून घेतली. त्यांचे स्पष्ट आदेश असताना देखील पोलीस विभागाकडून तपासामध्ये कसलाही प्रकारे प्रगती दिसून आलेली नाही. आई-वडील त्रस्त झाले असून पोलीस प्रशासनाकडून तपास होत नसल्यास सीआयडीच्या माध्यमातून तपास करण्यात यावा, अशी मागणी युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी केली आहे.

Web Title: The minor girl has been missing for seven months