देशी दारूच्या तस्करीला दुधाच्या कॅनचा आधार
By Admin | Updated: August 4, 2014 23:39 IST2014-08-04T23:39:06+5:302014-08-04T23:39:06+5:30
तालुक्यात देशी दारूची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरातील देशी दारूच्या दुकानांतून मोठ्या प्रमाणात तालुक्यातील बहुतांश गावामध्ये देशी दारुची अवैध तस्करी होत आहे.

देशी दारूच्या तस्करीला दुधाच्या कॅनचा आधार
राजुऱ्यातील प्रकार : पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे वाढतोयं प्रकार
राजुरा : तालुक्यात देशी दारूची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरातील देशी दारूच्या दुकानांतून मोठ्या प्रमाणात तालुक्यातील बहुतांश गावामध्ये देशी दारुची अवैध तस्करी होत आहे. विशेष म्हणजे दुधाच्या कॅमधून दारुची ही तस्करी केली जात आहे.
दुधाच्या कॅनमधून देशी दारुचे पव्वे चनाखा येथे नेत असताना अलिकडेच राजुरा पोलिसानी श्रावण वडस्कर याला पकडले. यावरून हा प्रकार उघडकीस आला आहे. राजुरा ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे.
राजुरातील नाका नंबर तीन लगतच्या परिसरातून देशी दारूचा पुरवठा गावागावात होत असल्याचे चित्र आहे. राजुरा हा भाग नक्षलग्रस्त क्षेत्रात मोडतो. पोलिसांच्या आशिर्वादानेच हा प्रकार सुरू असल्यचा आरोप नागरिकांकडून होत आहे. उत्पादन शुल्क अधिकारी मात्र झोपेत आहे. राजुरा शहरासुद्धा अनेक दिवसापासून अवैध भट्या सुरू असल्याने देशी दारूच्या विक्रीत वाढ झाली आहे. यापरिसरातील देशी भट्ट्या इतरत्र हलविण्याची मागणी महिला करणार आहे. (शहर प्रतिनिधी)