शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कोदेपारात एसआरटी धान रोवणीची पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:48 IST

उशिरा व अल्प पावसाने रोवणीला विलंब झाल्यास उत्पादन कमी होते. यावर धोका टाळण्यासाठी एस.आर.टी. ही रोवणी पद्धत उपाय ठरू शकेल काय, याचा प्रयोग कोदेपार येथील एका शेतकरी महिलेने केला. शशिकला श्रीराम माटे असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देमशागतीच्या खर्चात बचत : महिला शेतकऱ्याचे धाडस

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उशिरा व अल्प पावसाने रोवणीला विलंब झाल्यास उत्पादन कमी होते. यावर धोका टाळण्यासाठी एस.आर.टी. ही रोवणी पद्धत उपाय ठरू शकेल काय, याचा प्रयोग कोदेपार येथील एका शेतकरी महिलेने केला. शशिकला श्रीराम माटे असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.शशिकला माटे या नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहेत. त्यांच्याकडे सात एकर धानाची शेती आहे. आजपर्यंत पारंपरिक पद्धतीनेच शेती करीत होत्या. काहीतरी नवीन करावे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकरात धानाची रोवणी केली. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील वर्षी पूर्ण सातही एकरात याच पद्धतीने धानाची रोवणी करणार आहेत. या तंत्राविषयी म्हणाल्या, हे तंत्र कोकणात विकसित झाले आहे. एस.आर.टी तंत्र हे भातशेतीशी संबंधित नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरूपी गादी वाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करून उत्तम भात पिकवण्याचे नवे तंत्र आहे. यामुळे मशागत, बियाणे, मजुरी आदी खर्चात बचत होऊन उत्पादन आणि जमिनीच्या सुपिकतेमध्येही वाढ होते. या तंत्रात शेतीची मशागत व गादीवाफे एकदाच करायचे आणि मग या कायमस्वरूपी या गादीवाफ्यांवर एका मागून एक अशी फेरपालट पिके घेता येतात. या तंत्राचे अनेक फायदे आहेत. चिखलणी व लावणी न करायला लागल्यामुळे ३०-४० टक्के खर्च आणि ५० टक्के त्रास कमी होतो. चिखलणी करताना वाहून जाणाºया सुपीक मातीची धूप वाचेल व पुढच्या पिढीच्या हातात सुपीक जमीन देता येईल. गांडुळांची संख्या वाढते. रोपांमधील योग्य अंतरामुळे हवा खेळती राहते.गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत राहते. गादी वाफ्यामुळे कमी पावसात पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. अती पावसात शेतात पाणी साचून राहत नाही. गादीवाफ्यावर भातपिकानंतर नांगरणी न करता फेरपालटीची पिके घेता येतात. दोन पिकांमधील मशागतीचा वेळ आणि खर्च वाचतो. एकदाच केलेले हे गादीवाफे ८-९ वर्ष वापरता येतात. हे तंत्र सर्वसामान्य शेतकºया आत्मविश्वास आणि शेतकºयांना खºया अर्थाने बलवान करणारं ठरू शकते. हे तंत्र यशस्वी झाले तर त्यातून अनेक शेतकºयांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळू शकते, असेही माटे यांनी सांगितले.