प्रियदर्शिनीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:31 IST2021-09-21T04:31:02+5:302021-09-21T04:31:02+5:30

योजना कर्मचाऱ्यांचा २४ सप्टेंबरला संप चंद्रपूर : विविध ठिकाणी योजना कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शुक्रवार दि. २४ सप्टेंबर ...

Meritorious students felicitated at Priyadarshini | प्रियदर्शिनीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रियदर्शिनीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

योजना कर्मचाऱ्यांचा २४ सप्टेंबरला संप

चंद्रपूर : विविध ठिकाणी योजना कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शुक्रवार दि. २४ सप्टेंबर रोजी संप पुकारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी आनंद भवन येथे पार पडलेल्या मिटिंगमध्ये केले. यावेळी रेखा गजभिये, ताई भगत, बेबी पाटील प्रमिला वाहाणे, आदी उपस्थित होते.

पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस सुरू करा

चंद्रपूर : सर्व पोलीस कर्मचारी सण-उत्सावात २४ तास कर्तव्यावर असतात. परंतु, मागील काही वर्षात पोलिसांना दिवाळीमध्ये मिळणार बोनस बंद करण्यात आला आहे. सर्व शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांना बोनस मिळत असताना पोलीस कर्मचाऱ्यांंना बोनस न देणे चुकीचे आहे. त्यामुळे सर्व पोलिसांना दिवाळीचे बोनस देण्यात यावे, अशी मागणी सय्यद रब्बानी चिश्ची यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

विचार संवर्धन समितीची बैठक

चंद्रपूर : म. जोतिराव फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी विजय उमरे तर प्रमुख अतिथी म्हणून सर्व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालन अशोक देवगडे तर आभार राजू खोबरागडे यांनी मानले.

Web Title: Meritorious students felicitated at Priyadarshini