प्रियदर्शनी विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:00+5:302021-02-05T07:43:00+5:30
चंद्रपूर : समता शिक्षण विकास मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित प्रियदर्शनी कन्या विद्यालय बगड खिडकी चंद्रपूर येथील गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ ...

प्रियदर्शनी विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार
चंद्रपूर : समता शिक्षण विकास मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित प्रियदर्शनी कन्या विद्यालय बगड खिडकी चंद्रपूर येथील गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष तारा पोटदुखे तर प्रमुख पाहुणे म्हणून निता कोंतमवार, मंगला धोपटे, सहसचिव मेघा साटोणे, रजनी अल्लूरवार, मुख्यध्यापक आशा दाते आदी उपस्थित होते. यावेळी माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम येणारऱ्या सुफियाअंजूम शेख, द्वितीय सादिया अमजद अली, अनुसूचित जाती संवर्गातून प्रथम प्रतीक्षा मेश्राम, गणित विषयात प्रथम खुशबू यादव, हिंदी विषयात प्रथम पायल हजारे, सादिया अली, सोशल सायन्स विषयात प्रथम गौरी सोनकर, पायल रामटेके, मराठी विषयात सादिया अली, श्वेता मेश्राम, उषा केवट, पायल हजारे, प्रतीक्षा मेश्राम यासोबतच टाटा बिल्डिंग इंडियातर्फे आयोजित निबंध स्पर्धेतील अनुश्री चंद्रगिरीवार, प्रांजली गुप्ता, रागिनी उराडे यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.