बल्लारपुरात पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:25+5:302021-03-17T04:28:25+5:30

यात पुरुष गटातून ६५ किलो वजनात मराठा वॉरियर क्रीडा मंडळ, कोंडा अजिंक्य तर उपविजेता त्रिशूल क्रीडा मंडळ बल्लारपूर. त्याचप्रमाणे ...

Men's and Women's Kabaddi Competition at Ballarpur | बल्लारपुरात पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा

बल्लारपुरात पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा

यात पुरुष गटातून ६५ किलो वजनात मराठा वॉरियर क्रीडा मंडळ, कोंडा अजिंक्य तर उपविजेता त्रिशूल क्रीडा मंडळ बल्लारपूर. त्याचप्रमाणे ५५ किलो वजन गटात महाकाली क्रीडा मंडळ चंद्रपूर विजेता तर उपविजेता साईबाबाचे उद्दिष्ट क्रीडा मंडळ चंद्रपूर ठरले. महिला गटांमध्ये चंद्रपूर येथील विठ्ठल वायम शाळा विजेता तर उपविजेत्या श्रीराम बालक आखाडा बल्लारपूर हे ठरले. या स्पर्धेत चंद्रपूर बल्लारपूर गोंडपिपरी, वरोरा ,भद्रावती, कोंडा, गौरी मोहवाडा इत्यादी ठिकाणच्या मंडळांनी भाग घेतला होता.

बक्षीस वितरण भाजपाचे शहर सचिव सतीश कणकम, निलेश माळवे, लक्ष्मण पोहणे, कालूराम हजारे, गट्टू गंजाराला, धरमपाल, अशोक कणकम, गोलू पवार यांच्या उपस्थितीत झाले. भारत व्यायाम शाळेचे सुरेश घुबडे, दिलीप वाघाडे, श्रीनिवास गुमला, अखिल पोहणे, किशन घुबडे, शंकर तोकला, सलीम बेग, अरुण हजारे, पुपल पोहणे, प्रशांत बँडीवार, तेजपाल मानकर, राजू घुबडे इत्यादींचे सहकार्य लाभले.

Web Title: Men's and Women's Kabaddi Competition at Ballarpur