मेंढा, मांगरूड या दोन ग्रामपंचायती अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST2021-01-01T04:20:01+5:302021-01-01T04:20:01+5:30

सध्या प्रत्येक गावात प्रत्येकाच्या राजकीय अपेक्षा अतिशय तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे कोणी कोणाशी तडजोड करायला तयार नाही, अशा परिस्थितीत ...

Mendha, Mangrud or two gram panchayat conflicts | मेंढा, मांगरूड या दोन ग्रामपंचायती अविरोध

मेंढा, मांगरूड या दोन ग्रामपंचायती अविरोध

सध्या प्रत्येक गावात प्रत्येकाच्या राजकीय अपेक्षा अतिशय तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे कोणी कोणाशी तडजोड करायला तयार नाही, अशा परिस्थितीत मेंढा आणि मांगरूडकरांनी मनाचा मोठेपणा दाखवून गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध करून दाखविली. ही खरोखरच वाखाणण्याजोगी बाब आहे.

मेंढा ही ग्रामपंचायत नऊसदस्यीय आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नामांकन भरण्यास सुरुवात झालीे पण मेंढा येथे नऊ जागांसाठी नऊच नामांकने प्राप्त झाली. यात मुकेश दाजीबा रंधये, नारायण पांडुरंग कोरे, स्वाती यशवंत गायकवाड, भावना भाऊराव सलामे, कुंदा भाऊराव शेंडे, आनंद यशवंत कोरे, गोपिका संभाजी कोरे, पुष्पा रवींद्र कोरे आणि शांताराम सदाराम कोरे यांचा समावेश आहे.

मांगरूड ग्रामपंचायत सातसदस्यीय आहे. या ग्रामपंचायतीसाठीही सातच नामांकन आली. यात यशवंत शंकर मेश्राम, मंगला अरुण तराणे, गुलाब विश्वनाथ पुसाम, वैभव रामकृष्ण निकुरे, शशिकला कमलाकर लेनगुरे, आशा संदीप मसराम, रजनी प्रमोद लेंझे यांचा समावेश आहे.

Web Title: Mendha, Mangrud or two gram panchayat conflicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.