मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ३० अतिसंवेदनशील गावांमध्ये शांतता बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:18 IST2018-12-16T22:18:37+5:302018-12-16T22:18:57+5:30
वनविभाग ब्रह्मपुरी व वाईल्ड लाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी वनविभागातील ३० अतिसंवेदनशील गावांमध्ये शांतता बैठकीचे आयोजन सन २०१७-१८ या कालावधीमध्ये करण्यात आले.

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ३० अतिसंवेदनशील गावांमध्ये शांतता बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : वनविभाग ब्रह्मपुरी व वाईल्ड लाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी वनविभागातील ३० अतिसंवेदनशील गावांमध्ये शांतता बैठकीचे आयोजन सन २०१७-१८ या कालावधीमध्ये करण्यात आले. या बैठकांचे आयोजन गावाच्या मुख्य चौकात, जि.प. शाळा तसेच ग्रामपंचायत भवन परिसरात गावातील पुरुष, महिला, विद्यार्थी, वनविभागाचे कर्मचारी, वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाचे पदाधिकारी, गावातील वनसंवर्धनाशी निगडित विविध समित्यांच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्वांचा सहभाग या बैठकींमध्ये असावा, या उद्देशाने सायंकाळी ६ वाजताची वेळ ठरविण्यात आली.
बैठकीची सुरूवात सर्वांचा परिचय करून गाव, जंगल व जमीन यांचा सहसंबंध दर्शविणारा गावाचा गुगल नकाशा प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आला. तसेच ताडोबा-नवेगाव व नागझिरा या मध्ये भारतातील संवधित क्षेत्रांना कशा पद्धतीने गावाचे जंगल जोडले आहे, याबाबत चर्चा करण्यात आली. मानव-वन्यजीव संघर्ष गावात होण्याचे विविध कारणे शोधण्याचा प्रयत्न बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला. मुख्यत: मोह, तेंदू व इतर गौण वनोपज गोळा करताना तसेच शौचास बाहेर गेल्यास सर्वात जास्त मानव वन्यजीव संघर्ष झाल्याचे गावकºयांनी सांगितले. यावेळी गावकºयांनी घ्यावयाची काळजी यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सर्वांनी शौचालय बांधणे अतिआवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. गौण वनोपज गोळा करताना, शेतीचे काम एकट्याने न करता समुहाने करणे आवश्यक आहे, असे वाईल्ड लाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाचे फिल्ड आॅफीसर महेंद्र राऊत यांनी सांगितले. बैठकीत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाचे पशुवैद्यकीय डॉक्टर, विज्ञान तज्ज्ञ, सामाजिक तज्ज्ञ यांनी उपस्थित राहून प्रत्येकजण त्यांच्या विषयाला घेवून गावकºयांशी चर्चा केली. एकात्मिक वाघ अधिवास संवर्धन प्रकल्प आययुसीएन, केएफडब्ल्यू, कोआॅपरेशन, वनविभाग व वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया यांच्या मदतीने जानेवारी २०१७ पासून या भागात आरआरटी व पीआरटी टीम काम करीत आहे. गावकºयांनी त्यांचे प्रश्न बैठकीमध्ये सांगितल्याने वनकर्मचाºयांच्या उपस्थितीमध्ये त्यावर चर्चा करण्यात आली.