Corona Virus in Chandrapur; 'त्या' रुग्णाच्या वैद्यकीय अहवालावरून अधिकारी बुचकळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 12:53 IST2020-04-09T12:53:24+5:302020-04-09T12:53:46+5:30
नागपुरात मृत्यू झालेल्या चंद्रपूर येथील रुग्णाच्या कुटुंबातील पाच जणांसह डॉ. नगराळे यांच्या घशातील स्त्राव नमुने आज सकाळी अचानक घेण्यात आले.

Corona Virus in Chandrapur; 'त्या' रुग्णाच्या वैद्यकीय अहवालावरून अधिकारी बुचकळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागपुरात मृत्यू झालेल्या चंद्रपूर येथील रुग्णाच्या कुटुंबातील पाच जणांसह डॉ. नगराळे यांच्या घशातील स्त्राव नमुने आज सकाळी अचानक घेण्यात आले. सदर रुग्णाचा नागपूर येथील मेयोचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. परंतु नागपूर येथे भरती असलेल्या खासगी डॉक्टरने नमुने मुंबईत खासगी प्रयोगशाळेत पाठविले होते. ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्याचे चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सांगितले. वास्तविक, खासगीपेक्षा शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल अधिकृत असल्याचे डॉ. राठोड म्हणाले. यावरून सदर रुग्ण पॉसिटीव्ह वा निगेटिव्ह हा नवा वाद पुढे आला आहे. ही बाब नातेवाईक व डॉक्टर यांच्या रिपोर्टवरून स्पष्ट होणार आहे.