शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबातील ‘मयुरी’ वाघिणीच्या घातपाताची शक्यता बळावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:41 IST

Tadoba Andhari National Park: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पांतर्गत खडसंगी बफर वनपरिक्षेत्रात वाघिणीचे तीन बछडे आईपासून भरकटलेल्या अवस्थेत आढळून आले होते. यातील एका बछड्याचा मृत्यू झाला, तर दोन बछड्यांवर उपचार सुरू आहेत.

-  राजकुमार चुनारकर

चिमूर (जि. चंद्रपूर) : गेले दहा दिवस जंग जंग पछाडूनही बेपत्ता मयुरी वाघिणीचा मागमूस न लागल्याने या वाघिणीसोबत घातपात झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पांतर्गत खडसंगी बफर वनपरिक्षेत्रात वाघिणीचे तीन बछडे आईपासून भरकटलेल्या अवस्थेत आढळून आले होते. यातील एका बछड्याचा मृत्यू झाला, तर दोन बछड्यांवर उपचार सुरू आहेत. तेव्हापासून वनविभाग वाघिणीचा कसून शोध घेत आहे. 

मयुरीकडून बछड्यांचा शोध नाहीछड्यांपासून दूर असलेली वाघीण आक्रमक होते. अशा परिस्थितीत ती बछड्यांच्या शोधात शिवारात किंवा गावात येऊ शकते. मात्र, तसे काहीही झालेले नाही. मयुरी बछडे असलेल्या परिसरात आली नाही की कुठे कॅमेऱ्यात कैद झाली नाही. त्यामुळेच वाघिणीसोबत घातपात तर झाला नसेल ना, अशी चिंता वन विभाग व वन्यजीवप्रेमींना सतावत आहे. वनविभागही त्या दिशेने तपास करीत आहे. 

‘जय’ची पुनरावृत्ती होणार का?आशिया खंडातील सर्वात मोठा समजला जाणारा ‘जय’ वाघ २०१६ मध्ये उमरेड-कऱ्हांडला जंगलातून असाच अचानकपणे गायब झाला. अजूनही तो  सापडला नाही. त्यामुळे जयबाबत जे घडले, तेच मयुरीबाबत घडल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पTigerवाघ