शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाचा तिढा : चंद्रपूर काँग्रेसचा दरबार दिल्लीत; आजच्या बैठकीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:32 IST

Chandrapur : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता थेट दिल्लीच्या दरबारी पोहोचली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोन गटांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच आता निर्णायक टप्प्यावर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता थेट दिल्लीच्या दरबारी पोहोचली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदासाठीकाँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोन गटांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. दिल्ली दरबारी निघणारा तोडगा दोन्ही गटांना मान्य होणार की संघर्ष आणखी तीव्र होणार, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यासह चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसकडे एकूण २७ नगरसेवक असताना वडेट्टीवार गटाकडे १७, तर धानोरकर गटाकडे ९ नगरसेवक असल्याचे दावे केले जात आहेत. एका महिला नगरसेवकाने दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे मी त्यांच्या सोबत असेल अशी भूमिका घेतल्याचे समजते. महानगरपालिकेचा निकाल जाहीर होताच दोन्ही गटांनी नगरसेवकांची मोट बांधून दावे-प्रतिदावे सुरू केले. दरम्यान, अशा घडामोडी घडल्या. वडेट्टीवार गटावर पाच नगरसेवक पळविण्याचा ठपका ठेवण्यात आला. यानंतर दि. २९ जानेवारी रोजी समृद्धी महामार्गावर धानोरकर गटाकडून वडेट्टीवार गटातील नगरसेवकांची बस अडविण्याची घटना घडली आणि संघर्ष अधिकच चिघळला. अशातच सोमवारी गटनेता निवडण्याच्या अनुषंगाने वडेट्टीवार गटातील नगरसेवक राजेश अड्डूर यांनी धानोरकर गटातील नगरसेवकांच्या घरांवर बैठकीला येण्याची नोटीस चिटकविली.

या घडामोडींनी दोन्ही गटांतील दुरावा वाढतच चालला आहे. दोन दिवसांनी महापौरपदासाठी नामनिर्देशनपत्र भरायचे आहे, मात्र अद्याप गटनेताच निश्चित झालेला नाही. हा वाद प्रदेश काँग्रेसच्या आवाक्याबाहेर गेला.

या साऱ्या गदारोळानंतर अखेर हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही नेत्यांची दिल्ली येथे संयुक्त बैठक बोलाविली आहे.

दोन गटांच्या घडामोडी

  • घुग्घुस पालिकेत धानोरकर गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला उपाध्यक्षपद देण्याचा आग्रह. यावरून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये पुन्हा गटबाजीची ठिणगी पडली.
  • निवडणुकीत दोन्ही नेत्यांमध्ये तिकीट वाटपावरून मतभेद उघड
  • प्रचारादरम्यान जाहीर सभांतून दोन्ही नेत्यांमधील गटाबाजी दिसून आली.
  • मनपाचा निकाल लागताच दोन्ही गटांकडून आपापल्या परीने नगरसेवकांची जुळवाजुळव.
  • पाच नगरसेवकांना वडेट्टीवार गटाने पळविल्याचा ठपका
  • धानोरकर गटाकडून समृद्धी महामार्गावर वडेट्टीवार गटातील नगरसेवकांची बस अडविली.
  • गटनेता निवडीसाठी वडेट्टीवार गटाकडून धानोरकर गटातील नगरसेवकांच्या घरांवर बैठकीची नोटीस चिटकवली.
  • अखेर हा वाद थेट दिल्ली दरबारी.
English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Congress mayoral impasse: Delhi meeting to decide fate.

Web Summary : Chandrapur Congress faces a mayoral selection crisis due to factionalism between Vaddettiwar and Dhanorkar groups. The dispute escalated, leading to a Delhi meeting to resolve the issue. The outcome will determine the future of the mayoral position and party unity.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसMayorमहापौर