शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

‘माया’ झाली ताडोबात पर्यटकांसाठी ‘सेलिब्रिटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:04 PM

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया नावाची वाघीण सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. तिची एक झलक डोळ्यात साठविण्यासाठी जगभरातील पर्यटक आतुर झालेले आहे.

ठळक मुद्देएका झलकसाठी सारेच आतुरजगातील पर्यटकांना भुरळ

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया नावाची वाघीण सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. तिची एक झलक डोळ्यात साठविण्यासाठी जगभरातील पर्यटक आतुर झालेले आहे. ताडोबात आलेला प्रत्येक पर्यटक गाईडला माया कुठे दिसते असे विचारून त्या ठिकाणी जाण्याचा आग्रह धरत आहे. मायानगरीची नसली तरी मायानगरीतील सेलिब्रिटींसह येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘ती व तिचे बछडे’ ताडोबातील सेलिब्रिटी झाली आहे.ताडोबाच्या पर्यटनात दिवसागणिक वाढच होत आहे. चंद्रपूर जिल्ह्याने यंदा तापमानाचा उच्चांक गाठला. असे असताना ताडोबाच्या पर्यटनावर काहीएक परिणाम झालेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून ताडोबा फुल्ल आहे. ताडोबात प्रवेश केल्यानंतर पर्यटकांचा एकच आग्रह सुरू आहे. तो म्हणजे मायाची एक झलक टिपण्याचा. मायाही पर्यटकांची इच्छा पूर्ण करताना दिसत आहे. माया जेव्हा पर्यटकांपुढे येते तेव्हा एका ‘सेलिब्रिटी’सारखीच भासते. ती दिसताच पर्यटक अतिशय शांत राहतात. केवळ तिच्यावर आपले लक्ष केंद्रीत करून तिला डोळे भरून पाहण्याचा आनंद लुटताना दिसत आहे.सोमवारी सकाळी पर्यटनाला सुरूवात झाल्यापासून काही वेळातच मटकासूर नावाने प्रसिद्ध असलेला वाघ पाणवठ्यावर आला. त्यानंतर काहीवेळातच त्याचे व मायाचे दोन बछडे त्या ठिकाणी आले. त्यांच्या पाठोपाठ माया ऐटीत एका ‘सेलिब्रिटी’सारखी त्या ठिकाणी पोहचली. मायाने आपल्या परिवारासह भेट दिल्याचा हा दुर्मिळ प्रसंग पर्यटकांना ताडोबात अुनभवाला आला. यानंतर माया आपल्या दोन्ही बछड्यांसह पाणवठ्यावर एकमेकांशी खेळत होती. दोन्ही बछड्यांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीही पर्यटकांसाठी पर्वणीच होती. ते बछडे आईच्या अंगावरून उड्यामारून पाण्यात जात होते. हे तिघेही सोमवारी सेलिब्रिटीच झाले होते. नॅशनल जिओग्राफीवर बघायला मिळणारे दृश्य प्रत्यक्ष ताडोबात पाहून पर्यटकांचा आनंद गगणात मावेनासा झाला. खºया अर्थाने मायाने पर्यटनाचा आनंद दिल्याचे पर्यटक आपसात कुजबुजत होते. सकाळी आपल्या बछड्यांसह आलेली माया दिवसभर तिथेच मुक्कामाला होती. ती व तिचे बछडे पाण्यात जायचे आणि परत झाडाखाली येऊन बसायचे. ‘याची देही याची डोळा’ बघितलेला प्रसंग दुसऱ्या जिप्सीतील पर्यटकांना सांगण्याचा मोह आवरत नव्हता. त्यामुळे काहीवेळातच सर्व जिप्सी पर्यटकांना घेऊन त्या ठिकाणी पोहचल्या. आणि मायाला बघूनच अनेकांनी आपले पर्यटन पूर्ण केले. काहींनी हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला. पर्यटकांमध्ये या दुर्मिळ प्रसंगाचीच चर्चा रंगत होती.वाघ आणि हरीण एकाच पाणवठ्यावरआणखी एक गोष्ट ताडोबात पर्यटकांसाठी पर्वणीच ठरली ती म्हणजे पाणवठ्यावर लावलेल्या सोलरजवळ मायाचा एक बछडा पाण्यात बसला होता. अशातच हरणांचा कळप त्या ठिकाणी आला. त्यातील एकेक हरीण त्या वाघाच्या जवळून पाणवठ्यावर जात होते आणि आपली तृष्णा भागवित होते. हरीण पाणवठ्यावर जाताना निश्ंिचत दिसायचे. ऐरवी, वाघ आणि वाघाचे भक्ष्य म्हणून ओळखले जाणारे हरीण हे दोन्ही प्राणी कधीही एकाचवेळी एका ठिकाणी बघायला मिळत नाही. मात्र सोमवारी हे दृश्यही पर्यटकांना ताडोबात बघायला मिळाले. हा प्रसंग अविस्मरणीय असाच होता.वनविभाग व मराठी पर्यटकांवर विदेशी पर्यटक खुशताडोबात दररोज देश-विदेशातून असंख्य पर्यटक येतात. सोमवारी इंग्लंडमधील एक पर्यटक सकाळपासून माया व तिच्या बछड्यांच्या एकेक हालचाली टिपत होता. पर्यटन झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या वनविभागाचे तोंडभरून कौतुक केले. सोबतच मराठी पर्यटक खूप चांगला आहे. अशी शाबासकीची थापही दिली. हा पर्यटक देश-विदेशातील व्याघ्र प्रकल्पांची भ्रमंती करतो. या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या वनविभागासह मराठी पर्यटकांचे कौतुक केले.

टॅग्स :Tigerवाघ