माता चवडेश्वरी मंदिरासाठी निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:06+5:30

जीर्णोद्धाराचे काम तात्काळ पूर्ण व्हावे, याकरिता पाच लाखांचा निधी देणार, अशी घोषणा आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केली. नागभीड परिसरातील जनेतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागभीड येथील चवडेश्वरी माता मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.

Mata will fund the Chawadeswari Temple | माता चवडेश्वरी मंदिरासाठी निधी देणार

माता चवडेश्वरी मंदिरासाठी निधी देणार

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : माता चवडेश्वरी देवीचा आशीर्वाद भाविकांसाठी उपकारक ठरला असून देवीच्या मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जीर्णोद्धाराचे काम तात्काळ पूर्ण व्हावे, याकरिता पाच लाखांचा निधी देणार, अशी घोषणा आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केली.
नागभीड परिसरातील जनेतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागभीड येथील चवडेश्वरी माता मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राजन जयस्वाल तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष प्रा. डॉ. उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेवर, जि.प.सदस्य संजय गजपुरे, वसंत वारजूरकर, पंजाबराव गावंडे, प्रा. डॉ. अमीर धम्मानी, सभापती प्रणया गड्डमवार, व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्मानी, हनिफभाई जादा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्र्रशेखर विगम, प्रभाकर मेडपीलवार, अनिल लांबट, हरिभाऊ गरफडे, श्याम पाथोडे आदींची उपस्थिती होती. आमदार कीर्तीकुमार भांगडिया म्हणाले, नागभीड शहराच्या विकासासाठी विविध योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.
त्यातील काही सुरू आहेत. नागरिकांच्या हिताकरिता सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी नमुद केले. उपस्थित मान्यवरांनी मंदिराच्या इतिहासाबद्दल जुन्या आठवणींना उजाळा दिला.
हे मंदिर सर्व जनतेचे असून सर्वांनी मदत करण्याचे आवाहन प्रा. डॉ. जयस्वाल यांनी केले. यावेळी चवडेश्वरी देवस्थान नागभीडच्या वतीने आमदार कीर्तीकुमार भांगडिया व पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्रणया गड्डमवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय बंडावार, संचालन पराग भानारकर यांनी केले. संजय पातेवार यांनी आभार मानले.

Web Title: Mata will fund the Chawadeswari Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.