तळोधी (बा) पोलीस ठाण्यातर्फे मस्के यांचा सत्कार

By Admin | Updated: July 23, 2016 01:49 IST2016-07-23T01:49:24+5:302016-07-23T01:49:24+5:30

तळोधी (बा) पोलीस ठाणेतर्फे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पुंडलिक मस्के यांची नुकतीच नागभीड पोलीस ठाण्याला बदली झाल्यामुळे

Maske felicitated by Talovi (BA) Police Station | तळोधी (बा) पोलीस ठाण्यातर्फे मस्के यांचा सत्कार

तळोधी (बा) पोलीस ठाण्यातर्फे मस्के यांचा सत्कार

तळोधी (बा.) : तळोधी (बा) पोलीस ठाणेतर्फे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पुंडलिक मस्के यांची नुकतीच नागभीड पोलीस ठाण्याला बदली झाल्यामुळे त्यांचा पोलीस ठाण्यातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तळोधी (बा.) येथे गेल्या दोन वर्षांपासून सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक अवैध धंद्यांवर अंकुश मिळविला होता. तसेच पोलीस ठाणे निर्मितीकरिता त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेक सोनवणे व सहायक पोलीस निरीक्षक पुंडलिक मस्के यांनी तळोधी (बा.) पोलीस ठाण्याच्या निर्मितीपासून जवळपास अवैध धंद्यावर अंकुश मिळवून दारूबंदीच्या जवळपास १३० च्या आसपास केसेस केलेल्या आहेत. अनेक दारू विक्रेत्यांना जेलची हवा सुद्धा दाखवली.
अशा पद्धतीने कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून पुंडलिक मस्के यांची ओळख आहे. त्यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी नव्यानेच चंद्रपूर येथून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर यांची तळोधी (बा.) पोलीस ठाण्याला नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मस्के हे मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे कर्मचारी वर्गात कमतरता भासायला लागली आहे.
तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेक सोनवाने यांच्या हस्ते मंगळवारी पुंडलिक मस्के यांच्या पोलीस ठाणे येथे शाल व श्रीफळ देवून त्यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या निरोप समारंभाला तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Maske felicitated by Talovi (BA) Police Station