दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा पाठोपाठ रेखाकलेचे गुण गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:11+5:302021-04-02T04:29:11+5:30

चंद्रपूर : यावर्षी कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. यामुळे क्रीडा स्पर्धा ...

The marks of drawing followed the sports of the students of class X. | दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा पाठोपाठ रेखाकलेचे गुण गेले

दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा पाठोपाठ रेखाकलेचे गुण गेले

चंद्रपूर : यावर्षी कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. यामुळे क्रीडा स्पर्धा झाल्या नाही. परिणामी क्रीडाचे गुण विद्यार्थ्यांना मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. आता रेखाकला परीक्षेचेही गुण देण्यास कला संचालनालयाने नकार दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असून विद्यार्थ्यांना हक्काचे गुण द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे.

यावर्षी सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन झाले आहे. आता दहावीची परीक्षा अगदी तोंडावर आली आहे. या परीक्षा ऑलफाईन होणार आहे. या परीक्षेत क्रीडा व रेखाकलेचे गुण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरतात. अशा स्थितीत या दोन्ही विषयांचे गुण विद्यार्थ्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता विचारात घेऊन शासकीय रेखाकला परीक्षा २०२० चे आयोजन करण्यात येऊ नये, तसेच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नये, असा उल्लेख आहे. त्यामुळे आता रेखाकला परीक्षांचे सवलतीचे गुण मिळणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

बाॅक्स

परीक्षेत ग्रेडनुसार मिळणारे गुण

ए ग्रेड-०७

बी ग्रेड ०५

सी ग्रेड०३

बाॅक्स

परीक्षेला बसलेले विद्यार्थी

३५,०८१

कोट

एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेकरिता विद्यार्थी व चित्रकलेचे शिक्षक वर्षानुवर्ष मेहनत घेतात. यावर्षी परीक्षा झालीच नाही. याचा विद्यार्थी तसेच शिक्षक जबाबदार नाही. शासनाने पात्र विद्यार्थ्यांचे तरी रेखाकलेचे गुण द्यावे.

-सुदर्शन बारापात्रे

कला शिक्षक, चंद्रपूर

Web Title: The marks of drawing followed the sports of the students of class X.