विविध उपक्रमांनी साजरा झाला मराठी राजभाषा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST2021-03-04T04:52:28+5:302021-03-04T04:52:28+5:30

बल्लारपूर : येथील मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहाने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका ...

Marathi Rajbhasha Din was celebrated with various activities | विविध उपक्रमांनी साजरा झाला मराठी राजभाषा दिन

विविध उपक्रमांनी साजरा झाला मराठी राजभाषा दिन

बल्लारपूर : येथील मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहाने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कोतकेलवार, उपमुख्याध्यापिका आशा ढेंगळे, पर्यवेक्षिका विमल रच्चावार तसेच मृणाल भोरे, नंदा वंगलवार, बाभुळकर, आमटे, सविता बोप्पनवार, विद्यार्थिनी सिमरन शेख, वैष्णवी राखुंडे, तृप्ती सरकटे यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच समूहगीत, मराठमोळे गाणे, लावणी, नाटिका, कविता याशिवाय पोस्टर प्रदर्शन, गुजगोष्टी व असे उपक्रम घेऊन आंतराष्ट्रीय भाषा सप्ताह साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन अनुष्का रिठे यांनी केले. आभार विशाखा रायपुरे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षिका बाभुळकर, वनिता गुंफेवार, अमिता झाडे, नजमा शेख व इतर शिक्षिका व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Web Title: Marathi Rajbhasha Din was celebrated with various activities