कोविड लसीकरण ऑनलाईन नोंदणीबाबत अनेक अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:29 IST2021-05-11T04:29:59+5:302021-05-11T04:29:59+5:30
ऑनलाईन नोंदणीमुळे बाहेरगावातील लोक मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी येत आहेत. तसेच स्पॉट रजिस्ट्रेशन ही सुविधा बंद करण्यात आल्याने स्थानिक लोकांना ...

कोविड लसीकरण ऑनलाईन नोंदणीबाबत अनेक अडचणी
ऑनलाईन नोंदणीमुळे बाहेरगावातील लोक मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी येत आहेत. तसेच स्पॉट रजिस्ट्रेशन ही सुविधा बंद करण्यात आल्याने स्थानिक लोकांना लसीकरण करण्यात अडचण निर्माण होत आहे. महत्त्वाची अडचण म्हणजे ऑनलाईन कधी ओपन होतो व कधी पूर्ण होतो हे सुद्धा कळत नाही. ऑनलाईन स्लॉट ओपन होऊन १० ते १५ मिनिटात सर्व बुकिंग फुल्ल होतात. त्यामुळे नेमके कधी बुकिंग करावे, हे कळायला मार्ग नाही.
परिणामी ज्यांची ऑनलाईन नोंदणी नाही त्यांना लसीकरण देण्यास खूप अडचणी येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात हीच समस्या येत आहे. यावरून अनेक लसीकरण केंद्रांवर तणावाचे वातावरणसुद्धा निर्माण होत आहे.
या अडचणींवर मात करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य देणे, ऑनलाईन स्लॉट ओपन होण्याची एक नेमकी वेळ सांगणे, स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा ठेवणे, ऑनलाईन व ऑफलाईनचे बूथ वेगळे करणे, दुसऱ्या डोससाठी वेगळे बूथ तयार करणे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.