मनपात अधिकार नसलेला अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:46 IST2018-07-17T22:45:57+5:302018-07-17T22:46:13+5:30

चंद्रपूर महानगर पालिका सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. या महानगर पालिकेतील एक वरिष्ठ अधिकारी अधिकाराविनाच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यावरून मनपाचा आणखी एक भोंगळ कारभार पुढे आला आहे.

Mantle officer | मनपात अधिकार नसलेला अधिकारी

मनपात अधिकार नसलेला अधिकारी

ठळक मुद्देमनपाचा कारभार : जाणीवपूर्वक अधिकार डावलल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिका सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. या महानगर पालिकेतील एक वरिष्ठ अधिकारी अधिकाराविनाच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यावरून मनपाचा आणखी एक भोंगळ कारभार पुढे आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, महानगर पालिकेत उपायुक्त हे आयुक्तानंतरचे दुसरे महत्त्वाचे पद आहे. मात्र या पदाच्या अधिकाऱ्याकडे असलेले सर्व अधिकार महानगर पालिका प्रशासनाने काढून टाकले आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विजय देवळीकर हे महानगर पालिकेचे उपायुक्त आहे. त्यांच्याकडे आता कोणताही अधिकार नाही. ते दररोज कार्यालयात येतात. आपल्या खुर्चीवर दिवसभर बसून राहतात आणि कार्यालयाची वेळ झाल्यानंतर घरी जातात, अशी माहिती मनपाच्या सूत्राने दिली.
अधिक माहिती घेतली असता विजय देवळीकर यांची काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील कोरची नगरपंचायत येथे मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. अल्पकाळात बदली झाल्याने त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली. यामध्ये मॅटचा निकाल त्यांच्या बाजुने लागला. त्याची बदली रद्द करण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा चंद्रपूर महानगर पालिकेत उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी रूजू झाले.
मात्र तेव्हापासून त्यांच्याकडे असलेले सर्व अधिकार काढून टाकण्यात आले आहे. एखाद्या बड्या अधिकाºयाचे अधिकार का काढून घेण्यात आले, याबाबत महानगर पालिकेतील अधिकारी अनभिज्ञ आहे. हे कृत्य जाणिवपूर्वक केल्याचीही चर्चा आता मनपात ऐकायला मिळत आहे.

Web Title: Mantle officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.