मनपासमोर शिवसेनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:40 IST2018-03-06T00:40:31+5:302018-03-06T00:40:31+5:30

तिथीनुसार रविवारी शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले झेंडे लावण्यात आले होते.

Manpasamore Shivsena's demonstrations | मनपासमोर शिवसेनेची निदर्शने

मनपासमोर शिवसेनेची निदर्शने

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना घेराव : शिवाजी महाराजांचे झेंडे काढले

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : तिथीनुसार रविवारी शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले झेंडे लावण्यात आले होते. मात्र महानगरपालिकेने ते झेंडे काढल्याने संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमवारी मनपामध्ये जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यानंतर बाहेर येऊन निदर्शने केली.
यावेळी जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, शहर प्रमुख सुरेश पचारे, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेश नायडू, शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, माजी नगरसेवक आकाश साखरकर, माजी जिल्हा प्रमुख दिलीप कपूर यांच्यासह सेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. शहरात भाजपचे बॅनर चालतात तर मग शिवाजी महाराजांचे का नाही, असा प्रश्न शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करीत महानगर पालिकेसमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष डुमरे आणि उपायुक्त विजय देवळीकर यांचे कार्यालय गाठून त्यांच्याशी चर्चा केली. निदर्शने केल्यामुळे काही काळ महानगर पालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या निदर्शने आंदोलनात उपशहर प्रमुख संदीप कष्टी, हर्षद कानमपल्लीवार, विनोद अनंतवार, प्रमोद पाटील, अनुप बेले, चिराग नथवानी, लियास शेख, प्रणय धोबे, वासीम खान, सुरज घोंगे, विक्रांत सहारे, सिकंदर खान, गिरीश कतरे, किरण निब्रड, सागर मुंदडा, पिंटू धिरडे, शुभम मुक्कावार, वैभव काळे, गणेश ठाकूर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Manpasamore Shivsena's demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.