कर्जाचा सदुपयोग करून प्रगती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:25+5:302021-02-05T07:42:25+5:30

विजय वडेट्टीवार :१४२ छोट्या व्यावसायिकांना कर्ज वितरण चंद्रपूर : कोणत्याही बँका सहज कर्ज देत नाही. मात्र जिल्हा मध्यवर्ती ...

Make good use of debt | कर्जाचा सदुपयोग करून प्रगती करा

कर्जाचा सदुपयोग करून प्रगती करा

विजय वडेट्टीवार :१४२ छोट्या व्यावसायिकांना कर्ज वितरण

चंद्रपूर : कोणत्याही बँका सहज कर्ज देत नाही. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्याला केवळ दोन व्यक्तींच्या हमीपत्रावर तब्बल ५० हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. या रकमेत छोटा व्यवसाय चांगल्याने करता येतो, या कर्जाचा सदुपयोग करून आपल्या व्यवसायात प्रगती साधा, अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्व. राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १४२ छोट्या व्यावसायिकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाचे धनादेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते देण्याचा कार्यक्रम बँकेत आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर, बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, उपाध्यक्ष यशवंत दिघोरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्जाचे धनादेश संबंधितांना देण्यात आले. कार्यक्रमाला बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच बँकेचे ग्राहक उपस्थित होते.

Web Title: Make good use of debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.