शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मूल तालुक्यात येणार महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST

राजू गेडाम मूल : राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मूल तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्तारूढ असलेल्या पक्षाला जनतेने नाकारत ...

राजू गेडाम

मूल : राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मूल तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्तारूढ असलेल्या पक्षाला जनतेने नाकारत सत्तापरिवर्तन घडवून आणल्याचे दिसून आले. ५ व ६ फेब्रुवारी रोजी सरपंचपदाची निवडणूक होत असून, ३७ पैकी २१ गावांत महिला सरपंच विराजमान होणार असल्याने निवडणूक हालचालींना वेग आला आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात भाजप, काँग्रेसला जनतेने काही प्रमाणात नाकारत मतदारांनी आठ ग्रामपंचायतींवर शिवसेना, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी व युवा परिवर्तन आघाडीने आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेस १४, तर भाजपला १३ ग्रामपंचायतींवरच समाधान मानावे लागले होते. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आपली सत्ता येईल, असे दावे-प्रतिदावे केले जात होते. मात्र, या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत नवपरिवर्तन घडून आल्याचे दिसून आले. या निवडणुकीत काँग्रेसने भादुर्णी, राजोली, चिखली, मोरवाही, मरेगाव, चिमढा, चांदापूर, चिरोली, खालवसपेठ, दाबगाव मक्ता, नांदगाव गागलवाडी, भादुर्णी, कोसंबी या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली, तर भाजपने मारोडा, काटवन, मुरमाडी, डोंगरगाव, बोरचादली, फिस्कुटी, विरई, गोवेर्धन, हळदी, पिपरी दीक्षित, जुनासुर्ला, नवेगाव भूजला, बोडाळा बुज ग्रामपंचायतींची सत्ता काबीज केली आहे. यात विशेष म्हणजे ८ गावांत जनतेने नवीन पक्ष व आघाडीला झुकते माप देत परिवर्तन घडवून आणल्याचे दिसून आले. यात शिवसेनेने भवराळा, सुशी, वंचित बहुजन आघाडीने केळ्झर, आम आदमी पार्टीने चितेगाव, तर गावात एकत्र येऊन तयार केलेल्या युवा परिवर्तन आघाडीने टेकाडी, जानाळा, चिचाळा, येरगाव या गावांत सत्ता मिळविली.

मूल तालुक्यात ३७ ग्रामपंचायतींवर सरपंच विराजमान होणार असून, २१ महिला सरपंच होणार आहेत. एकप्रकारे मूल तालुक्यात महिलाराज येणार हे निश्चित झाले आहे.