रक्तदानाच्या महायज्ञाला शुक्रवारी चंद्रपुरातून शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST2021-07-01T04:20:45+5:302021-07-01T04:20:45+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकारात जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन रेडक्राॅस सोसायटी व ...

Mahayagya of blood donation started from Chandrapur on Friday | रक्तदानाच्या महायज्ञाला शुक्रवारी चंद्रपुरातून शुभारंभ

रक्तदानाच्या महायज्ञाला शुक्रवारी चंद्रपुरातून शुभारंभ

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकारात जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन रेडक्राॅस सोसायटी व सोमय्या पाॅलिटेक्निक चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदानाच्या या महायज्ञात रक्तदान करण्यासाठी शहरातील रक्तदात्यांसह विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनी आपली नोंदणी केलेली आहे. हे शिबिर दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रत्येकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह जिल्ह्यालाही रक्ताची गरज : डाॅ. अनंत हजारे

ज्यांना कोरोना झाला, अशा रक्तदात्यांना २८ दिवसांनंतर रक्तदान करता येते, तसेच ज्यांनी कोविड लस घेतली आहे, असे रक्तदाते १४ दिवसांनंतर रक्तदान करू शकतात, अशी महत्त्वपूर्ण माहिती जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डाॅ.अनंत हजारे यांनी दिली. यामुळे रक्तदानाबाबत भीती बाळगू नये. ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत आहे. महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणालाही ऐन वेळी रक्त न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागणार नाही. कोरोनाच्या या संकटात रक्तदानाचे महत्त्व वाढले आहे. या शिबिरात प्रत्येक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून रक्ताची उणीव भरून काढावी, असे आवाहनही डाॅ.अनंत हजारे यांनी केले आहे.

Web Title: Mahayagya of blood donation started from Chandrapur on Friday