महात्मा जोतिबा फुले अभ्यासिका तसेच स्मारक उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:39+5:302021-02-06T04:50:39+5:30
बहुजन समाज पार्टीचे महापौरांना निवेदन चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा वॉर्डात, मिलिंद नगर येथे १५-२० वर्षांपूर्वी नगर परिषदेच्या सहभागाने समाज ...

महात्मा जोतिबा फुले अभ्यासिका तसेच स्मारक उभारावे
बहुजन समाज पार्टीचे महापौरांना निवेदन
चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा वॉर्डात, मिलिंद नगर येथे १५-२० वर्षांपूर्वी नगर परिषदेच्या सहभागाने समाज मंदिर उभे करण्यात आले होते. आज हे समाज मंदिर जीर्ण झाले आहे. त्यामुळे या जागेवर महात्मा जोतिबा फुले अभ्यासिका तसेच स्मारक उभारावे, अशी मागणी करण्यात आली असून, यासंदर्भात महापौर राखी कंचर्लावार यांना निवेदन देण्यात आले आहे.
या समाजमंदिराच्या ठिकाणी पठानपुरा वॉर्डातील विद्यार्थी, होतकरू मुले-मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका व त्यांचे स्मारक उभारल्यास फायदा होईल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे शहर अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, उपाध्यक्ष प्रशांत रामटेके, महासचिव सागर वरघणे, राजेश कुंभालवार, राहुल कामटे, सागर करमरकर, शरद दुर्गे, जय बजाज, दुर्गेश शर्मा, प्रीतम बोबडे आदींची उपस्थिती होती.