शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

maharashtra election 2019 ; मतदारांना बसण्यास सहा रुपयाची खुर्ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 6:00 AM

राजकुमार चुनारकर । लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून ८ तारखेपासून प्रचाराचा धुराळा उडणार आहे. ...

ठळक मुद्देनिवडणुकीचे दर निश्चित : नेते बसणार ३०० रुपयांच्या सोफ्यावर

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून ८ तारखेपासून प्रचाराचा धुराळा उडणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या नास्ता, जेवण तर मतदाराच्या बसण्याच्या व्यवस्थेचे ही दर निवडणूक आयोगाने निश्चित करून दिले आहेत. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांना सहा रुपये दराचा चहा प्यावा लागणार तर मतदारांना सहा रुपयाच्या खूर्चीवर बसावे लागणार आहे चहा-६ रुपये, कॉफी-१०, लस्सी, कोल्ड ड्रिंक ३० रु.,स्नॅक्स (प्रति प्लेट) २० रु., हे मेन्यूकार्ड हॉटेलचे नसून जिल्ह्यातील निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेले दरपत्रक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी उमेदवाराने किती खर्च करावा, याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा ज्वर हळूहळू चढू लागला असतानाच उमेदवारांना खर्चाच्या बंधनाचेही भान ठेवावे लागत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारास कमाल २८ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे. राज्यात चंद्रपूर औद्योगिक जिल्हा म्हणून गणला जातो. या जिल्ह्यासाठी निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने किती खर्च करता येईल, हे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार, बँड पार्टी दहा व्यक्ती पथक चार हजार रुपये, बँड पार्टी २० व्यक्ती दहा हजार इतका खर्च अपेक्षित आहे. छोटया टोप्यांसाठी १५ रुपये व गांधी टोपीसाठी २० रु. पक्षाचा गमचा ५० रु., स्टीकर सात रु., मुखवटा १५ रु. या दराने खरेदीची माहिती सादर करावी लागेल.वाहनचालकांना आठ तासांच्या डयुटीसाठी 500 रु. देणे अपेक्षित आहे. सुमो, टेम्पो, ट्रॅक्स असल्यास प्रत्येक दिवसासाठी इंधनासह १३०० रु.बिनाइंधन एक हजार रुपये भाडे, एसी इनोव्हा-तवेरासाठी १५०० रु., अवजड ट्रकसाठी डिझेलसह नऊ हजार, बिनाडिझेल सहा हजार रुपये प्रत्येक दिवसाला याप्रमाणे भाडे असेल.५० आसनी बससाठी आठ हजार इंधनासह तर सहा हजार बिनाइंधन, इंधनासह तीनचाकी आॅटोसाठी हजार रुपये व इंधनाविना ९०० रुपये, दुचाकीसाठी दोनशे रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.लाऊडस्पिकरचेही भाडे ठरलेमाईक-लाऊडस्पिकर (एक माईक दोन स्पिकर) ७५० रुपये, प्रत्येक दिवसासाठी चार स्पिकर आणि दोन मायक्रोफोन चार हजार रुपये, व्हिडीओग्राफी कॅमेरा प्रत्येक दिवसासाठी दीड हजार रुपये आणि स्टेजवरील सायडिंग साठी १२०० रुपये दर आहे. या दराप्रमाणे बिल द्यावे लागेल.साधा हार ३० रुपयेप्रचारफेऱ्यांमध्ये फुलांसह गुच्छांचा होणारा वापर लक्षात घेऊन त्यासाठीही दर निश्चित केले आहेत. साध्या हारासाठी ३० रुपये, मध्यम हारासाठी २५ रुपये, मोठया हारासाठी ५० रूपये आहे. तर प्रचार करून भूक लागल्यावर जेवण, नास्त्यासाठीही दर निश्चित केले आहेत. व्हेज लंच, राईस प्लेट प्रत्येकी ९० रु., दुपार आणि रात्रीच्या जेवणासाठी वेगळे दर ठरविले आहेत. व्हेज थालीसाठी शंभर रु., नॉनव्हेज थालीसाठी २०० रु. असे हे दर आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर