शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; ब्रह्मपुरीत काँग्रेस-शिवसेनेत थेट लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. ही मते टिकविण्याचे आव्हान उमेदवारापुढे आहे. आपच्या अ‍ॅड. गोस्वामी यांचाही भाजपच्या नाराज मतांवर डोळा आहे. हा चमत्कार घडल्यास निवडणुकीचे चित्र वेगळे राहू शकते. विद्यमान स्थिती बघता काँग्रेस आणि शिवसेनेत दुरंगी लढतीची शक्यता आहे.

ठळक मुद्देवडेट्टीवारांमुळे राज्याचे लक्ष : आपचा भाजपच्या नाराज मतदारांवर डोळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात खरी लढत काँग्रेस आणि शिवसेनेतच असली तरी वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीमुळे चुरस कायम आहे.या मतदार संघात एकूण ११ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार येथे काँग्रेसकडून दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधात संदीप गड्डमवार यांनी शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे चंद्रलाल मेश्राम, आम आदमी पार्टीकडून अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, बसपाकडून मुकुंदा मेश्राम, भाकपकडून विनोद झोडगे, संभाजी ब्रिगेडकडून जगदीश पिल्लारे या राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह प्रणव सोमनकर, विश्वनाथ श्रीरामे, अजय पांडव व विनय बांबोळे हे अपक्ष उमेदवारही दंड थोपटून आहेत. गेल्या १३ दिवसांच्या काळात सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला असला तरी यामध्ये काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व आपच्या उमेदवारांचा प्रचार आघाडीवर आहे. काँग्रेसचे उमेदवार वडेट्टीवार यांची मतदार संघावर मजबूत पकड असून ते गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षात असतानाही कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला हे मतदारांना पटवून देत आहेत. या भागात शेतकऱ्यांना सिंचनासाठी गोसेखुर्दचे पाणी उपलब्ध करून दिले ही बाब त्यांची बाजू भक्कम करणारी ठरत आहे. शिवसेनेचे उमेदवार गड्डमवार यांच्याकडे विकासाचा कोणताही महत्त्वपूर्ण मुद्दा नाही. सहानुभुतीचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांचा अधिकतम प्रभाव सावली तालुक्यात आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दल भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. भाजपची नाराज मते आपल्या पारड्यात टाकण्यात त्यांना कितपत यश येते यावरही बरेच काही अवलंबून आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. ही मते टिकविण्याचे आव्हान उमेदवारापुढे आहे. आपच्या अ‍ॅड. गोस्वामी यांचाही भाजपच्या नाराज मतांवर डोळा आहे. हा चमत्कार घडल्यास निवडणुकीचे चित्र वेगळे राहू शकते. विद्यमान स्थिती बघता काँग्रेस आणि शिवसेनेत दुरंगी लढतीची शक्यता आहे. आप आणि वंचित बहुजन आघाडीमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

टॅग्स :bramhapuri-acब्रह्मपुरी