महाज्योती देणार ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:46+5:302020-12-22T04:27:46+5:30
मूल : राज्य शासनाच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठीसाठी महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ...

महाज्योती देणार ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण
मूल : राज्य शासनाच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठीसाठी महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेचीची निर्मिती केली आहे. या माध्यमातून ओबीसी,एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. महत्वाच्या शासकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा जेईई, एमएच, सीईटी नीट अशा देत असतात. पण त्यासाठी विशेष स्पर्धा परीक्षेचे महागडे कोचिंग क्लास लावण्याची आर्थिक कुवत ओबीसी, भटके व विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नसते. त्यामुळे हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकाव धरू शकत नाही. शासनाच्या महाज्योतीने २०२२ मध्ये होणार्या या स्पर्धा परीक्षेसाठी, ओबीसीच्या १० हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व परीक्षेसाठी तयारी करून देण्याचा कार्यक्रम तयार केला आहे. त्यासाठी वर्ग ११ वी विज्ञान शाखेत शिकणार्या ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन महात्मा फुले समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांनी केले आहे.