थकीत करवसुलीसाठी आता लकी ड्रा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST2021-03-17T04:29:07+5:302021-03-17T04:29:07+5:30

शंकरपूर : मॉडेल ग्रामपंचायत म्हणून समजली जाणारी आणि नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या शंकरपूर ग्रामपंचायतने गाळेधारकाकडे थकीत रक्कम वसूल करण्यासाठी ...

Lucky draw scheme now for overdue tax collection | थकीत करवसुलीसाठी आता लकी ड्रा योजना

थकीत करवसुलीसाठी आता लकी ड्रा योजना

शंकरपूर : मॉडेल ग्रामपंचायत म्हणून समजली जाणारी आणि नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या शंकरपूर ग्रामपंचायतने गाळेधारकाकडे थकीत रक्कम वसूल करण्यासाठी करवसुली लकी ड्रा योजना ही नवीन अभिनय योजना आणलेली आहे.

शंकरपूर ग्रामपंचायतमार्फत ९२ गाळेधारक आहेत. या ९२ गाळेधारकाकडे आतापर्यंत १५ लाख रुपयाचा मासिक किराया थकित आहे. ते १५ लाख रुपये वसूल करण्यासाठी शंकरपूर ग्रामपंचायतने कर वसुली लकी ड्रा योजना अमलात आणलेली आहे. मार्च २०२१ पर्यंत गाळे व्यावसायिक संपूर्ण थकीत व चालू किराया भरतील त्या व्यावसायिकांना यात समाविष्ट करण्यात येणार आहे. या लकी ड्रामध्ये प्रथम बक्षीस टू व्हीलर असून टीव्ही दोन ,फ्रीज चार, दोन वाॅशिंग मशीन, कूलर ,तीन कपाट ,दोन सोपे, दोन डायनिंग सेट, चार शेगड्या, सहा सिलिंग फॅन, सहा टेबल फॅन, १५ टी टेबल, २१ खुर्ची आणि २१ वाटर कॅन अशी एकूण ९२ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक गाळे धारकांना हमखास बक्षीस मिळणार आहे.

बॉक्स

योजनेचा खर्च देणार पदाधिकारी

हे अडीच लाख रुपये सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनातून आणि सरपंच यांच्या स्वनिधीतून देण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा भार ग्रामपंचायतीवर किंवा विकासकामावर पडणार नाही. गाळे धारकांसाठी ही अभिनव योजना राबवणारी जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत असावी. या योजनेमुळे गाळेधारक मासिक किराया भरतील ही आशा ग्रामपंचायतला आहे.

कोट

बऱ्याच वर्षापासून गाळेधारकाकडे मासिक किराया बाकी आहे. वारंवार नोटीस पाठवूनही हे गाळेधारक मासिक किराया भरत नसल्यामुळे कर वसुली लकी ड्रॉ योजना आणलेली आहे. ही योजना सरपंच उपसरपंच यांच्या व सरपंच यांच्या स्वनिधीतून आम्ही अमलात येणार आहे. १५ एप्रिलला याची सोडत काढण्यात येणार आहे.

-साईश सतीश वारजूकर, सरपंच शंकरपूर.

Web Title: Lucky draw scheme now for overdue tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.