लोकमतचे चुनारकर व देरकर पुरस्कृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 21:57 IST2018-10-07T21:57:23+5:302018-10-07T21:57:44+5:30
लोकमतचे चिमूर तालुका प्रतिनिधी राजकुमार चुनारकर व कोरपना तालुका प्रतिनिधी आशिष देरकर यांना ग्रामीण वार्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

लोकमतचे चुनारकर व देरकर पुरस्कृत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकमतचे चिमूर तालुका प्रतिनिधी राजकुमार चुनारकर व कोरपना तालुका प्रतिनिधी आशिष देरकर यांना ग्रामीण वार्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळा स्थानिक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात रविवारी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरूण दिवाण आणि विजय बनपूरकर यांचा कर्मवीर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी विविध पूरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये ग्रामीण वार्ता पुरस्कार धनराज खानोरकर, निलकंठ ठाकरे, जितेंद्र सहारे, मानवी स्वारस्य क्षेत्रातील प्रतिष्ठीत पुरस्कार चुन्नीलाल कुडवे, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया गटाचा पुरस्कार दुसऱ्या वर्षीही अनवर शेख यांना मिळाला. वृत्त छायाचित्र स्पर्धेत संदीप रायपूर, शुभवार्ता गटामध्ये हितेश गोहकार यांना पुरस्कृत करण्यात आले. संचालन प्रशांत विघ्नेश्वर तर आभार जितेंद्र मशारकर यांनी मानले.