लोकमत सखी मंच सभासद नोंदणी जिल्हाभरात उत्साहात सुरू
By Admin | Updated: February 2, 2017 00:34 IST2017-02-02T00:34:23+5:302017-02-02T00:34:23+5:30
लोकमत सखी मंचतर्फे २०१७ च्या सभासद नोंदणीला सुरूवात झाली असून नविन नोंदणीकरिता असलेली सखींची प्रतीक्षा आता संपलेली आहे.

लोकमत सखी मंच सभासद नोंदणी जिल्हाभरात उत्साहात सुरू
बक्षीसांचा वर्षाव : वर्षभर नाविन्यपूर्ण उपक्रम, राज्यस्तरीय लकी ड्रॉ, हवाई सफर
चंद्रपूर : लोकमत सखी मंचतर्फे २०१७ च्या सभासद नोंदणीला सुरूवात झाली असून नविन नोंदणीकरिता असलेली सखींची प्रतीक्षा आता संपलेली आहे.
जिल्हाभरातील सखी मंचाच्या तालुकास्तरावर नोंदणीस सुरूवात झाली असून चंद्रपूर शहरात मागील वर्षीप्रमाणे यंदाही एकदिवसीय नोंदणी राबविण्यात येणार आहे. त्याकरिता शहरातील विविध भागातील केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा सखींना उपलब्ध करून देणार आहोत. ा चंद्रपूर शहरातील जुन्या सखी सदस्यांना ४५० रुपये आणि नवीन सदस्य नोंदणी करणाऱ्या सखींना ५०० रुपये नोंदणी शुल्क असून ग्रामीण भागातील सखींसाठी ३०० रु. आणि ३५० रु. नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.
केवळ २०१६ चे सखी मंचाचे ओळखपत्र ग्राह्य धरल्या जाईल.सोबतच वर्षभर दमदार कार्यक्रमाची मेजवानी सखी मंच सभासदांना मिळणार आहे. सर्व इच्छुक सखींनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. याकरिता खालील तालुका सखी मंच संयोजिका व सहसंयोजिका यांच्याशी संपर्क साधावा.
भद्रावती- अल्का वाटकर (८८८८४६३२४६), जयश्री कामडी (९६७३२६५५२२), वरोरा- उज्ज्वला खिरटकर (९४२१९२६४७४), कल्पना ताटकुंडवार (८००७८७३९७२), ब्रह्मपुरी- शिला चरपटे (९४०३४९३३५९), साधना केळझरकर (९४०३४९३३६०), नागभीड- रजनी घुटके (९४०५२६७५९२), किरण गोडे (९७६५२३२७६६), सिंदेवाही- शोभा खराते (९९२३१५६११२), नवरगाव- गिता सलामे (९७६७१५७५३७), मूल- जयश्री चन्नुरवार (९५०५५०३८९९), राजश्री मुस्तीलवार (९४२०१४२४१४), राजोली- प्रा. अर्चना गंटलेवार (९६७३५१००४६), राजुरा- कृतिका सोनटक्के (९९२२९३०१५१), जयश्री देशपांडे (९६२३२३९३४३), बल्लारपूर- किरण दुधे (९२२६७४६२००, विणा झाडे (९८२३८०४३५३), कोठारी- रोशनी कांबळे (९४२१८८००२८), कोरपना- इंदिरा कोल्हे (८८५५०३८२६६), नांदाफाटा- निशा चटप (८८०६२३४०४९), गडचांदूर - कल्पना निमजे (९८६०१०३७७७), माया धोटे, गोंडपिपरी - स्मिता बांगडे (९५४५७९७५३९), प्रियंका सातपुते (९४०५९८५०९७), जिवती - वर्षा गुरमे (८५५२००१५१३), ऊर्जानगर- हेमलता झटाले (९४२३४१८९२४) यांच्याशी संपर्क साधावा.
अशा मिळणार भेटवस्तू
सभासद नोंदणी करणाऱ्या सखींना मिळणार अंजली नॉनस्टीक फ्राय पॅन १, १ लाखाचा वैयक्तिक अपघाती मृत्यूविमा, ‘अशावेळी’ बुक, सखी मंच ओळखपत्र, सखी ज्वेलर्स तर्फे एक पुणेशाही नथ किंवा बांगड्या फ्री, सोबतच आशीर्वाद लॅब चंद्रपूरतर्फे २५० रुपये किंमतीचे थॉयराइड चेकअप फ्री कुपन देण्यात येणार आहे.