शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; उमेदवारांना चिन्ह वाटप; आता प्रचाराची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:10 IST

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित व अंतिम १३ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आलेले आहे. दरम्यान, निवडणूक निरीक्षक दीपांकर सिन्हा यांनी उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देवॉर्डावॉर्डात मोर्चेबांधणी : ध्वनीक्षेपकधारकांना सुगीचे दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित व अंतिम १३ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आलेले आहे. दरम्यान, निवडणूक निरीक्षक दीपांकर सिन्हा यांनी उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता उद्या शुक्रवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी दाखल अर्ज व छाननी करून एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ उमेदवारांंपैकी चार उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता उर्वरित १३ उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. काँग्रेस, भाजप, बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षांना त्यांच्या कायमस्वरूपी निवडणूक चिन्हांशिवाय इतरांना विविध निवडणूक चिन्हे दिली गेली आहेत. यात भाजपचे हंसराज अहीर यांना कमळ, कॉग्रेसचे सुरेश धानोरकर यांना हात, बहुजन समाज पार्टीचे सुशील वासनिक यांना हत्ती, बहुजन मुक्ती पार्टीचे डॉ गौतम गणपत नगराळे यांना चारपाई ( खाट ), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ पांडुरंग मडावी यांना एअर कंडीशन, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नामदेव माणिकराव शेडमाके यांना करवत, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे नितेश आनंदराव डोंगरे यांना कोट, प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर विठ्ठल निस्ताने यांना गॅस सिलिंडर, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र श्रीरामजी महाडोळे यांना कपबशी, अपक्ष उमेदवार अरविंद नानाजी राऊत यांना स्विच बोर्ड, नामदेव केशव किनाके यांना आॅटोरिक्षा, मिलिंद प्रल्हाद दहिवले यांना बॅट, राजेंद्र कृष्णराव हजारे यांना गन्ना किसान यांचा समावेश आहे. आता निवडणूक प्रचार जोर धरणार असून ९ एप्रिलला प्रचाराची अंतिम तारीख आहे. ११ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होऊन २७ मे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख असणार आहे.१० एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेशभारत निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी लोकसभेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता अंमलात आली असून या काळात निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच निवडणुकीचे कामे हाताळताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात १० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी घनश्याम भुगावकर यांनी लागू केले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी, याकरीता पोलीस अधीक्षक, यांनी सादर केलेला अहवाल पाहता मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये जिल्ह्यात २७ मार्च ते १० एप्रिल रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मुंबई पोलिस अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठया किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेवून फिरणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, सार्वजनिक शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे, हावभाव करणे अथवा सोंग आणणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सभा घेण्यास, मिरवणूक काढण्यास, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या परवानगीशिवाय काढण्यात आलेले मोर्चे, रॅली, सभा, ३७ (१) (३) हा आदेश ज्यांना लाठी अगर तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा अपंग व्यक्तींना लागू होणार नाही. तसेच शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक