लॉकडाऊन टळले, निर्बंध कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:41+5:302021-03-31T04:28:41+5:30
सुधारित आदेशानुसार कार्यालये, दुकाने, औद्योगिक क्षेत्र, वाणिज्यिक आस्थापनांनी कामाच्या वेळा निश्चित कराव्यात. कामाच्या ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरण करावे, ...

लॉकडाऊन टळले, निर्बंध कायम!
सुधारित आदेशानुसार कार्यालये, दुकाने, औद्योगिक क्षेत्र, वाणिज्यिक आस्थापनांनी कामाच्या वेळा निश्चित कराव्यात. कामाच्या ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरण करावे, रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम बंद राहतील. लग्न समारंभसाठी ५० व्यक्ती व अंत्यविधीसाठी २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी राहील. सर्व वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा पूर्ण क्षमतेने तर सर्व खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात कार्यालय प्रमुखांनी कोविड शिष्टाचाराचे नियमांची अंमलबजावणी करावी. कार्यालयात मास्कशिवाय प्रवेश नाही, शिवाय प्रवेशद्वारावर तापमान मोजणे बंधनकारक आहे. मास्क न वापरल्यास ५०० रुपये व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
हॉटेल्स, खाद्यगृहे रात्री ८ वाजताच बंद
सार्वजनिक ठिकाणे उद्याने, बगिचे, पार्क, चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स, प्रेक्षकगृह व हॉटेल्स, उपहारगृह, खाद्यगृहे हे रात्री ८ ते सकाळी ७ वाजतापर्यंत बंद राहतील. मात्र, हॉटेल्स, उपहारगृह, खाद्यगृहांमार्फत पार्सल सुविधेला रात्री ११ वाजतापर्यंत सुरू ठेवता येणार आहे. ...
...अन्यथा कोविड रुग्णालयात रवानगी
गृहविलगीकरणातील रुग्ण पॉझिटिव्ह असल्याबाबतचा फलक त्याच्या घरासमोर ठळकपणे दिसेल, असा लावावा. त्यावर गृहविलगीकरणाचा कालावधी नमूद करावा. रुग्णाच्या हातावर शिक्का मारावा. रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांनी अत्यावश्यक गरजेशिवाय बाहेर फिरताना आढळल्यास गृहविलगीकरणातील रुग्णाला कोविड सेंटरमध्ये हलविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा सुरूच
सर्व वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा पूर्ण क्षमतेने तर सर्व खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. उत्पादन क्षेत्रातील कंपन्या कोविड महामारी सुरू असेपर्यंत बंद ठेवाव्या लागणार आहेत.