स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:59 IST2018-06-13T00:59:48+5:302018-06-13T00:59:48+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या मार्गी लावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : कार्यकर्ता व लोकप्रतिनिधींच्या परिश्रमामुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता विधान परिषदेच्या सभागृहात पोहोचला. याची जाणिव ठेवूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे मत आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी केले. कार्यकर्त्यांच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी आमदार अॅड. संजय धोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जि. प. समाज कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, पंचायत समिती सभापती सुनील मडावी, उपाध्यक्ष चेतन गौर, गडचांदूर न. प. च्या उपाध्यक्ष आनंदी मोरे, विनायक देशमुख,बबन निकोडे, सुरेश केंद्रे मंंगेश श्रीराम आदी उपस्थित होते.
आमदार डॉ. आंबटकर यांनी जिल्ह्यातील काही समस्यांचाही यावेळी उहापोह केला. आमदार अॅड. धोटे म्हणाले, जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यकर्त्यांनी कार्य केले पाहिजे. ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी सेलोकर, अरुण म्हस्की, जि. प. सदस्य सुनील उरकुडे,गोंडपिपरीचे नगर अध्यक्ष संजय झाडे, सभापती दीपक सातपते यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रवी बुरडकर, संचालन दिलीप वांढरे यांनी केले. प्रशांत घरोटे यांनी आभार मानले.