स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यात चार ठिकाणी धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:00 AM2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:31+5:30

वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या १२ पेट्या आढळून आल्या. यावेळी दारुसाठा व वाहन असा तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई भद्रावती येथे करण्यात आली. या कारवाईत दोन लाख ८० हजार रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला.

The local crime branch has a raid in four places in the district | स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यात चार ठिकाणी धाडसत्र

स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यात चार ठिकाणी धाडसत्र

Next
ठळक मुद्देदहा लाखांचा मुद्देमाल जप्त : पोलिसांची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार ठिकाणी धाड टाकून दारु नऊ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी व रविवारी भद्रावती व चंद्रपुरात करण्यात आली.
पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारुविक्रेत्याविरोधात विशेष मोहीम सुरु केली आहे. शनिवारी एका वाहनातून दारुचा साठा येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सापळा रचून लक्ष्मीनगर वडगाव परिसरात कारवाई करण्यात आली.
यावेळी वाहनचालक वाहन सोडून पसार झाला. वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या १२ पेट्या आढळून आल्या. यावेळी दारुसाठा व वाहन असा तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई भद्रावती येथे करण्यात आली. या कारवाईत दोन लाख ८० हजार रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला. तर तिसरी कारवाई चंद्रपूर येथील बिनबा गेट परिसरात करण्यात आली.
यावेळी एका घरात पोलिसांनी धाड टाकली. घरातील बेसिंनच्या टबखाली ३५५ देशी दारुच्या बॉटल आढळून आल्या. यावेळी सर्व ३४ हजार ५०० रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली. तर रविवारी दुपारी बिनबा गेट परिसरात एका इंडिगो गाडीतून २१ पेट्या दारु व वाहन असा दोन लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरील सर्व कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जायले, पद्माकर भोयर, हेड कॉन्स्टेबल भुजाडे, बगमारे आदींनी केली.
चिमुरात ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त
चिमूर : पारडपार येथे दारुसाठा असल्याची माहिती चिमूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पारडपार येथील वामन वाघमारे यांच्या घरी धाड टाकून ६२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. पारडपार येथील वामन वाघमारे हा आपला सहकारी सोमेश्वर चौधरी सह दारू विक्री करतो. पोळा सण समोर असल्याने दारूचा साठा लपवून ठेवलेला होता. ही माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी पारडपार येथील त्या दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून झडती घेतली असता ६२ हजार ४०० रुपये किंमतीच्या ६२४ नग देशी दारूच्या १८० मिलीच्या बॉटल आढळून आल्या. मात्र आरोपी फरार झाला. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी मारोती इंगवले, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम, पोलीस शिपाई कैलास आलाम, विनायक सरकुंडे यांनी केली.

Web Title: The local crime branch has a raid in four places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.