चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पद्मापूर येथील कचरा परिसरात एके-४७ रायफलचे एक जिवंत काडतूस सोमवारी सकाळी आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे काडतूस ७.६x३३ एमएम कॅलिबरचे असून, सुमारे २१ वर्षे जुने असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, ही काडतुसे नेमकी आली कुठून, याचा तपास सुरू केला आहे.
पद्मापूर गावाबाहेरील ज्या परिसरात कचरा टाकला जातो. त्या भागात शौचास गेलेल्या एका व्यक्तीस काडतूस दिसले. त्यांनी ही माहिती दुर्गापूर पोलिसांना दिली. दुर्गापूरचे ठाणेदार पर्यवेक्षाधीन आयपीएस अधिकारी गौरव कायंदेपाटील यांच्यासह चमूने घटनास्थळ गाठले. दरम्यान, बॉम्बशोधक पथक, श्वान पथक, सी-६० पथक आणि क्यूआरटीच्या जवानांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून झाडाझडती घेतली. मात्र, परिसरात इतर कोणतेही संशयास्पद साहित्य सापडले नाही. त्या काडतुसाची पाहणी केली असता, २००७ मधील मॅन्युफॅक्चरिंग असल्याची त्यावर नोंद आढळून आली.
काडतूस बॅलिस्टिक तपासणीसाठी
एके-४७ सारखी अत्याधुनिक शस्त्र केवळ पोलिस विभाग किंवा विशिष्ट सुरक्षा दलांकडेच असतात. मात्र, नियमानुसार जुना साठा सरावासाठी वापरून संपवला जातो. पोलिसांनी स्थानिक वन विभाग आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडेही चौकशी केली असून, हे काडतूस त्यांच्या साठ्यातील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे काडतूस बॅलिस्टिक तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर हे काडतूस उपयोगी होण्यासारखे आहे की नाही, हे स्पष्ट होईल, असे आयपीएस गौरव कायंदेपाटील यांनी सांगितले.
Web Summary : A live AK-47 cartridge was discovered in Padmapur forest, Chandrapur, causing alarm. The 7.6x33mm cartridge, potentially 21 years old, is under investigation. Bomb disposal and C-60 teams searched the area. The cartridge, manufactured in 2007, is sent for ballistic analysis to determine its origin and usability.
Web Summary : चंद्रपुर के पद्मापुर जंगल में एके-47 का एक जिंदा कारतूस मिलने से सनसनी फैल गई। 7.6x33 मिमी का कारतूस, जो संभवतः 21 साल पुराना है, जांच के अधीन है। बम निरोधक दस्ते और सी-60 टीमों ने इलाके की तलाशी ली। 2007 में निर्मित कारतूस को बैलिस्टिक विश्लेषण के लिए भेजा गया है ताकि इसकी उत्पत्ति और उपयोगिता का पता लगाया जा सके।