शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

निवडणुकीसाठी जिल्ह्यात चार दिवस मद्यविक्री बंद; मतमोजणीच्या दिवशीही मद्यविक्री राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:34 IST

आदेश जारी : मुक्त व निर्भय वातावरणात मतदानाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत जिल्ह्यात सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्रीची दुकाने चार दिवस बंद राहणार आहेत. १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजेपासून १९ व २० नोव्हेंबरचा संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीचा २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवावी, असा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी दिला आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या सर्व जागांसाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी शनिवारी (दि. २३) होणार आहे. 

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ (सी) च्या तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र देशी दारू नियम १९७३ नियम २६ (१) (सी) (१) महाराष्ट्र विदेशी मद्य (सेल ऑन कॅश, रजिस्टर ऑफ सेल्स इ.) नियम १९६९ मधील नियम ९ ए (२) (सी) (१) तसेच विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम १९९२ चे नियम ५ (१०) (बी) (सी) (१) व महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडी झाडे (छेदणे) नियम ५ (अ) (२) नुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात पार पडणे बंधनकारक आहे. त्यासाठीच जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील निवडणूक कालावधीत ठोक व किरकोळ मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. 

बँकांतील संशयास्पद व्यवहारांवरही करडी नजर निवडणूक काळात बँकांतील संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर दक्षता आयोगाने करडी नजर ठेवली आहे. आयोगाला वित्तीय गुप्तवार्ता शाखेकडून (एफआययू) याबाबत माहिती मिळण्यास सुरुवात झाली आहे. एफआययूच्या अहवालामुळे संगनमताने होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर लगाम लावण्यास मदत मिळणार आहे.

ही दुकाने बंद राहतील

  • चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या नमुना (सीएल-२, सीएल-३. सीएल, एफएल, टिओडी-३ एफएल-१, एफएल-२ एफएल-३ एफएल-४, १ एफएल/बीआर-२, टिडी-१ (ताडी) इत्यादी सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
  • नमूद कालावधीत आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये कडक कारवाई करण्यात येईल तसेच ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती निलंबित अथवा रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद आहे. या आदेशाचे सर्व परवाना धारकांनी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४liquor banदारूबंदीchandrapur-acचंद्रपूर