शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चंद्रपूर जिल्ह्यात विजांचा पाऊस, 6 जणांचा मृत्यू; 10 जण जखमी

By राजेश भोजेकर | Updated: July 26, 2023 20:20 IST

मृतकांमध्ये चार महिला, शेतकरी व वनमजूर तर जखमींमध्ये चार मुली व पाच महिला.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी विजांचा पाऊस पडला. वीज पडून तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला. तर दहाजण गंभीर जखमी झाले. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे दोन महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे एक महिला, पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा माल येथे एक महिला, कोरपना तालुक्यातील चनई(बु.) येथे तरुण शेतकरी तर गोंडपिपरी तालुक्यातील चिवडा वनक्षेत्रात वनमजुर अशा सहा जणांचा वीज पडून मृत्यू झाला. जखमींमध्ये जणांचा समावेश आहे. यामध्ये सिंदेवाही -१, नागभीड -३ व पोंभूर्णा तालुक्यातील सहा जणांचा समावेश आहे.

मृतकांमध्ये अंजना रुपचंद पुस्तोडे (४५) व कल्पना प्रकाश झोडे (४०) दोघीही रा. देलनवाडी ता. सिंदेवाही, प्रांजली ऊर्फ गीता पुरुषोत्तम ढोंगे (४१) रा. बेटाळा ता. ब्रह्मपुरी, पुरुषोत्तम अशोक परचाके (२५) रा. चनई बु. ता. कोरपना, गोविंदा लिंगा टेकाम(५४) रा. चिवडा ता. गोंडपिपरी, पोंभूर्णा तालुक्यातील घटनेत अर्चना मोहन मडावी (२७) रा. सास्ती (गौरी ) ता. राजुरा यांचा समावेश आहेत. जखमींमध्ये सुनीता सुरेश आनंदे (३५) रा. देलनवाडी ता. सिंदेवाही, शफिया सिराजूल शेख (१६) व महेक रफीक शेख (१६) दोघीही रा. नांदेड ता. नागभीड, रोहिणी विकास थेरकर (२०) रा. गिरगांव ता. नागभीड, खुशाल विनोद ठाकरे(२८), रेखा अरविंद सोनटक्के (४५), सुनंदा नरेंद्र इंगोले (४६), राधिका राहुल भंडारे (२०), वर्षा बिजा सोयाम (४७) व रेखा ढेकलू कुडमेथे (५५) सर्व वेळवा माल ता. पोंभूर्णा यांचा समावेश आहे.सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी शिवारात सुरेश आनंदे यांच्या शेतात महिलावर्ग धान रोवणी करीत असताना दुपारी ३ वाजताच्या सुमारास विजांच्या

कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. अशातच वीज कोसळल्याची घटना घडली. यामध्ये अंजना रुपचंद पुस्तोडे व कल्पना प्रकाश झोडे यांचा जागीच मृत्यू झाला तर, सुनीता सुरेश आनंदे ही महिला गंभीर जखमी झाली. गिरगाव येथील रोहिणी विकास थेरकर (२०) ही गिरगाव-झाडबोरी मार्गावरील भिवानगर परिसरात रोवणीसाठी गेली असता विजांच्या कडकडाटाने शेतातच बेशुद्ध पडली. महिलांनी तिला नवरगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते.

ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा शेतशिवारात प्रांजली ऊर्फ गीता पुरुषोत्तम ढोंगे या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप सुरू झाली. गीता ढोंगे बेटाळा-पारडगाव रस्त्याच्या बाजूला शेतात काही महिला-पुरुषांसोबत रोवणी करण्यासाठी गेली होती. शेतातून परत येताना मेघगर्जना होऊन अचानक वीज कोसळली.

कोरपना तालुक्यातील खैरगाव (सावलहिरा) येथील शेतशिवारात पिकाला फवारणी करत असताना चनई बू. येथील पुरुषोत्तम अशोक परचाके या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाली. ही घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या शेतकऱ्याचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.गोंडपिपरी तालुक्यातील करंजी उपवनक्षेत्रातील चिवडा कक्ष क्रमांक १३८ मध्ये रोपवनाचे काम करताना गोविंदा लिंगा टेकाम हा वनमजूर जागीच ठार झाला. इतर मजूर लांब अंतरात झाडाखाली थांबले होते. घटनेच्या २० मिनिटांपूर्वी पाऊस आला होता. थोडी उसंत घेऊन परत आलेल्या पावसात वीज पडून ही घटना घडली.

नागभीड तालुक्यातील नांदेड येथील शेतशिवारात रोवणी करून घराकडे परतताना अचानक वीज पडल्याने शफिया सिराजूल शेख (१६) व महेक रफीक शेख (१६) या मुली गंभीर जखमी झाल्या. दोघींवर तळोधी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून ब्रह्मपुरी येथे हलविले आहे.पोंभूर्णा तालुक्यात पोंभूर्ण्यापासून अवघ्या चार किमी अंतरावरील वेळवा माल शेतशिवारात ढेकलू कुडमेथे यांच्या शेतात धान रोवणी करणाऱ्या शेतमजुरांवर वीज कोसळली. यात वडीलाकडे शेतीचे काम करण्यासाठी आलेल्या अर्चना मोहन मडावी या मुलीचा मृत्यू झाला तर सहा मजूर जखमी झाले. ही घटना दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास घडली. शेताच्या बाजूला खुशाल विनोद ठाकरे हे बैल चारत होते. तेही गंभीर जखमी झाले. खुशालला चंद्रपूरला उपचारार्थ हलविण्यात आले.

दैव बलवत्तर म्हणून ‘ते’ महिला-पुरुष बचावले

ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथील घटनेत गीता ढोंगे या महिलेसोबत आणखी सात-आठ महिला व चार-पाच पुरुष रोवणीचे काम करीत होते. अचानक पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट सुरु झाला. रोवणी थांबवून घरी परतण्यासाठी पायवाटेने निघाले. काही महिला-पुरुष समोर निघाले. गीता त्यांच्या मागे तर थोड्या अंतरावर इतर महिला-पुरुष होते. अचानक लख्ख प्रकाश पडला. काही कळायच्या आत वीज कोसळली. त्यात गीताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दैव बलवत्तर म्हणूनच इतर महिला-पुरुष थोडक्यात बचावले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरDeathमृत्यूRainपाऊस