सावत्र मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:15+5:302021-04-02T04:29:15+5:30

वरोरा : सावत्र मुलीवर सतत अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायाधीश एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वरोरा यांच्या कोर्टाने आजन्म ...

Life imprisonment for abusing stepdaughter | सावत्र मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आजन्म कारावास

सावत्र मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आजन्म कारावास

वरोरा : सावत्र मुलीवर सतत अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायाधीश एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वरोरा यांच्या कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

चिमूर तालुक्यातील पीडित मुलीचे शोषण होत असल्याची तक्रार पोलीस स्टेशन चिमूर येथे दाखल करण्यात आली होती. सदर घटनेचा तपास गणेश इंगोले यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या घटनेत आरोपी अब्दुल कलीम शेख हा आपल्याच चुलत मुलीवर अत्याचार करत होता. पीडित मुलीच्या सख्या आईचा १२ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर पीडित मुलगी, सावत्र भाऊ व सावत्र बहीण हे सावत्र वडील अब्दुल कलीम शेख यांच्यासोबत चिमूर येथे किरायाच्या घरात राहत होते. घटनेच्या तीन महिन्यापूर्वी पीडितेचे लग्न ठरले होते. दरम्यान, सावत्र वडिलाची वाईट नजर सावत्र मुलीवर पडली. आरोपी वारंवार सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी देत असे. त्यामुळे सावत्र वडिलाचे हे कृत्य नाईलाजास्तव पीडित कित्येक दिवस सहन करत राहिली. मात्र काही दिवसांपूर्वी एक नातेवाईक घरी आले. पीडित मुलीने आपबीती त्यांना सांगितली. नातेवाईकाने धीर देत पीडितेला पोलीस स्टेशन चिमूर येथे तक्रार नोंदविण्यास सांगितले. जिल्हा न्यायाधीश एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वरोरा डी. के. भेंडे यांच्या न्यायालयाने आरोपी अब्दुल कलीम शेख याला आजन्म कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावला.

Web Title: Life imprisonment for abusing stepdaughter