शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने नागरिकांना दिले घनकचरा व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

सद्यस्थितीत होत असलेले वातावरण बदल आणि दिवसेंदिवस वाढते तापमान ही अतिशय चिंतेची बाब आहे. तसेच कचरा हीदेखील शहरापुढील मोठी समस्या आहे. मात्र, ओल्या कचऱ्यापासून जैविक खतनिर्मिती करणे हा उद्योग अत्यंत कमी खर्चात सुरू करता येतो. याचा लाभ महिलांना घेता यावा, त्या माध्यमातून कचऱ्याची समस्या सोडविता येईल, तसेच उद्योगनिर्मितीसुद्धा करता येईल, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

ठळक मुद्देआता नागरिक करणार घनकचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका व समाज कार्य महाविद्यालयाद्वारे घनकचरा व्यवस्थापन व कंपोस्ट खत कसे तयार करावयाचे, याबाबतचे धडे नागरिकांना देण्यात आले. शहरातील अष्टभुजा वार्ड येथे महिलांना एकत्र करून त्यांना घनकचºयापासून कंपोस्ट खत कसे करायचे हे समजावून सांगण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.रोजच्या जीवनात प्रचंड प्रमाणात तयार होणाºया कचºयाचे विघटन कसे करायचे, घरातील कचºयाचा घरातच सदुपयोग कसा करता येईल, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.सद्यस्थितीत होत असलेले वातावरण बदल आणि दिवसेंदिवस वाढते तापमान ही अतिशय चिंतेची बाब आहे. तसेच कचरा हीदेखील शहरापुढील मोठी समस्या आहे. मात्र, ओल्या कचऱ्यापासून जैविक खतनिर्मिती करणे हा उद्योग अत्यंत कमी खर्चात सुरू करता येतो. याचा लाभ महिलांना घेता यावा, त्या माध्यमातून कचऱ्याची समस्या सोडविता येईल, तसेच उद्योगनिर्मितीसुद्धा करता येईल, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.स्वयंपाक घरातील ओट्यापासून निर्माण होणारा कचरा, स्वयंपाकघरातील ओला कचरा म्हणजे जैविक, कुजणारा कचरा होय. ज्याचे नैसर्गिकरित्या विघटन होऊन खत तयार होऊ शकते, मुख्यत: हे काम गृहिणीचे आहे. भाजी, फळे, निर्माल्य, नारळाच्या शेंड्या, कांद्याची टरफले कागदाचे तुकडे हे गांडूळ खतासाठी वापरता येत असल्याचे यावेळी महेंद्र राळे यांनी समजावून सांगितले.इंद्रधनुष्याच्या रंगानुसार पथकाची निर्मितीबेटर चांदा मोहिमेद्वारे या युवक-युवतींची इंद्रधनुष्याच्या रंगाच्या धर्तीवर वेगवेगळे पथक निर्माण करण्यात आले असून हे पथक शहरात विविध कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्याचे काम करीत आहे. या युवांचा उत्साह वाखाणण्याजोगा असून चंद्रपूर शहर स्वच्छ व्हायलाच हवे, हा मूलमंत्र त्यांनी ध्यानी बाळगला आहे. आयुक्त संजय काकडे यांच्या विचारांतून या युवामोहिमेची सुरुवात करण्यात आली असून सहायक आयुक्त धनंजय सरनाईक यांच्या मार्गदर्शनात पालकमंत्री फेलो पूजा द्विवेदी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात युवा संपूर्ण शहरात जनजागृती करीत आहेत. प्रत्येक शाळा, महाविद्यालये, प्रभाग, मोहल्ला येथे कार्यक्रम घेत आहेत.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका