शंकरपूर जनतेची कोविड लसीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST2021-04-21T04:28:13+5:302021-04-21T04:28:13+5:30

त्यामुळे अजूनही लोकांमध्ये लसीकरणाची भीती असल्याचे जाणवत आहे. शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २८ गावे ...

Lessons of Shankarpur people towards Kovid vaccination | शंकरपूर जनतेची कोविड लसीकरणाकडे पाठ

शंकरपूर जनतेची कोविड लसीकरणाकडे पाठ

त्यामुळे अजूनही लोकांमध्ये लसीकरणाची भीती असल्याचे जाणवत आहे. शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २८ गावे येत असून या गावासाठी शंकरपूर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ज्यांचे वय ४५ वर्षांच्या वर आहे, अशा जनतेने लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु या लसीकरणाकडे शंकरपूर व परिसरातील जनतेने पाठ फिरवल्याचे निदर्शनास येत आहे. ३१ मार्चपासून येथील लसीकरण सुरू असून १९ एप्रिल पर्यंतच्या २० दिवसात फक्त ५६० लोकांनी लसीकरण केले आहे तर महसूल कर्मचारी ३१ आणि आरोग्य कर्मचारी ११ यांनी लसीकरण केलेले आहे. परिसरात २८ गावात हजारो लोक ४५ वर्षांच्या वर आहेत. तरीपण ते लसीकरणासाठी का येत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे तसेच ग्रामपंचायतच्या वतीने गावात लसीकरण करण्यासाठी जनतेने स्वतःहून पुढाकार घ्यावा, यासाठी दररोज दवंडी दिली जात आहे. इतकेच नाही तर ही दवंडी संपूर्ण २८ गावात दिली जात आहे. परंतु लोक लसीकरणासाठी येत नाही. आशा वर्कर हे घरोघरी जाऊन लसीकरणासाठी प्रोत्साहित करीत आहेत. परंतु त्यांनाही कोणताच प्रतिसाद मिळत नाही.

कोट

कोविड लसीकरण जनतेच्या आरोग्यासाठी आहे. हे लसीकरण केल्यास कोविड आजार होण्याची शक्यता कमीच असते. झालाच तरी त्याची तीव्रता कमी असते. या लसीकरणामुळे मृत्यू होतो, अथवा इतर आजार होतात. या अफवा असून हे लसीकरण सुरक्षित आहे. त्यामुळे जनतेने घाबरून न जाता कोविड लसीकरण करून घ्यावे.

-डॉ सुजाता शंभरकर प्रा आरोग्य केंद्र शंकरपूर.

Web Title: Lessons of Shankarpur people towards Kovid vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.